भारतीय बौध्दमहासभेच्या सिन्नर अध्यक्षपदी जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 07:00 PM2019-07-21T19:00:01+5:302019-07-21T19:00:33+5:30
सिन्नर : सिन्नर तालुका भारतीय बौद्ध महासभा तथा दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया सिन्नर शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक मधुकर जाधव यांची निवड करण्यात आली.
येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर सिन्नर तालुका भारतीय बौद्ध महासभा तथा द बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाची बैठक पार पडली. त्यात अध्यक्षपदी जाधव यांची निवड यांची निवड करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस व्यासपीठावर जिल्हा अध्यक्ष नामदेव पगारे, महासचिव राजू जगताप, कोषाध्यक्षप्रकाश जगताप, संघटक मनोज गाडा, सचिव रत्नाकार साळवे आदी उपस्थित होते. या बैठकीत नूतन सिन्नर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. दत्ताजी पगारे (सरचिटणीस), रमाकांत वाघ (कोषाध्यक्ष), पर्यटन विभाग उपाध्यक्ष (ज्येष्ठ साहित्यिक दीपक गायकवाड, विजय मोरे, संतोष साळवे), संस्कार विभाग उपाध्यक्ष (जगन्नाथ जारे, कैलाश रु पवते, विशाल जाधव ), संरक्षण विभाग उपाध्यक्ष (हेमंत निकम, अभिजित जाधव) , कार्यालयीन सचिव (प्रवीण रणशेवरे), संघटक (प्रभाकर जाधव मा. नगर सेवक, मधुकर बंडू जाधव), भास्कर रु पवते (हिशोब तपासणीस) बैठकीस भारतीय बहुजन महासंघ तालुका अध्यक्ष प्रवीण जाधव, शशिकांत भोळे, विल्यम शिंदे योगेश जाधव, प्रवीण कर्डक ,संजय कटारनवरे, वसंत ढाकणे, धम्मपाल शिरसाट, रामचंद्र जाधव, पोपट जाधव, दिवाकर जाधव, मधुकर साळवे, अशोक रु पवते, सुधाकर रु पवते, उदय रुपवते, प्रीतम रुपवते, पंढरीनाथ जाधव, चरणदास रामटेके , दत्ता यादव, दीपक निकम तसेच सिन्नर तालुका भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य, सिन्नर तालुक्यातील भारिपचे कार्यकर्ते उपस्थित होते.