जिल्हा परिषद शाळा पाटविहीर येथे तंबाखूमुक्तीचा जागर जागर फेरी : विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:42 AM2018-02-04T00:42:08+5:302018-02-04T00:42:48+5:30
कळवण : तंबाखूमुक्तीचा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजविण्यासाठी कळवण तालुक्यातील सर्व शाळा, शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्तीची शपथ दिली.
कळवण : तंबाखूमुक्तीचा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजविण्यासाठी कळवण तालुक्यातील सर्व शाळा, शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्तीची शपथ देऊन तंबाखूमुक्तीचा जागर केला असल्याची माहिती सलाम मुंबई फाउण्डेशनचे समन्वयक नीलेश भामरे यांनी दिली. जिल्हा परिषद शाळा पाटविहीर येथे कर्करोग दिनानिमित्त सरपंच श्रावण पालवी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपस्थितांना समन्वयक नीलेश भामरे यांनी तंबाखू खाणे किती धोकादायक आहे याची माहिती स्पष्ट करून तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ दिली. यावेळी मुख्याध्यापक भिकूबाई सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी जगताप, सर्व सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक बाजीराव गावित, साळूबाई बागुल, मीनाक्षी आहेर, वंदना सपकाळे आदी उपस्थित होते. तंबाखूजन्य पदार्थांच्या परिणामामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. म्हणून कर्करोग दिनानिमित्त जन्मभर तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प शिक्षण विभागाकडून पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी बी.टी. चव्हाण, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्याकडून करण्यात आला.