जगदंबा देवी परिसर झाला सुनासुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 03:54 PM2020-10-19T15:54:49+5:302020-10-19T15:56:10+5:30
वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व प्रशासनाच्या मार्गदर्शकतेचे पालन व्हावे यासाठी नियोजित उपाययोजनास अनुसरुन उत्सव कालावधीत याचा प्रभाव जाणवत असुन कोरोनाचे सावट जाणवते आहे.
वणी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व प्रशासनाच्या मार्गदर्शकतेचे पालन व्हावे यासाठी नियोजित उपाययोजनास अनुसरुन उत्सव कालावधीत याचा प्रभाव जाणवत असुन कोरोनाचे सावट जाणवते आहे. नवरात्र उत्सव रद्द झाल्यानंतर सर्व कार्यक्रमावर निर्बंध आले आहेत. कोवीड नियमांचे कडक पालन करण्याच्या सुचना प्रशासनाच्या असल्याने जगदंबा देवी मंदीराचे दर्शनी व मागील भागातील प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात मानाच्यापुजा असणाऱ्यांना केवळ दोन व्यक्तीसाठी प्रवेश असुन पहील्या पायरी बाहेर टिव्ही व फोटोद्वारे दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे. मात्र परिसरात व या ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी पोलीस बंदौबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेले देवी भागवत यावर्षी आयोजीत करण्यात आले आहे, मात्र कथा वाचन व ग्रहण करणारे अशा दोनच व्यक्ती उपस्थित राहत आहे. प्रातः, मध्यान्ह व सायं आरतीलाही नियमांच्या पालनाकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते आहे. त्यात नवरात्र स्थापनेपासुन दररोज पावसाची हजेरी लागत असल्याने पाऊस माळेत अडकला व नऊ दिवस हजेरी लावेल असा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच कोरोनाचा प्रभाव व सावट स्पष्टपणे उत्सवावर दिसुन येत असल्याने कोरोनाच्या संकट निवारणासाठी भगवतीला भाविकांनी साकडे घातले आहे.