"जय हनुमान ज्ञान गुण सागर...", नाशकात चंद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी हनुमंताला साकडे!
By संजय पाठक | Published: August 23, 2023 03:22 PM2023-08-23T15:22:31+5:302023-08-23T15:22:57+5:30
भारताची चंद्रयान ३ माेहिम महत्माची असून आज हे यान चंद्रावर उतरणार असल्याने नाशिकमध्ये उत्साह आहे.
नाशिक - देशाची महत्वकांक्षी चंद्रयानाची मोहिम अंतिम टप्प्यात असताना आज नाशिकमध्ये ही मोहिम यशस्वी व्हावी यासाठी हनुमनाला साकडे घालण्यात आले. येथील क्षत्रिय समाज फाऊंडेशनच्या वतीने हनुमानाची पुजा करण्यात आली. भारताची चंद्रयान ३ माेहिम महत्माची असून आज हे यान चंद्रावर उतरणार असल्याने नाशिकमध्ये उत्साह आहे.
शाळा महाविद्यालयांबरोबरच विविध संस्थाच्या माध्यमातून सायंकाळी इस्त्रोच्या मोहिमेचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर करण्याचे नियोजन आहे. त्यातच ही मोहिम यशस्वी व्हावी यासाठी नाशिकच्या क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने हनुमान मंदिरात पूजा करत प्रार्थना करण्यात आली. क्षत्रिय समाज फाउंडेशन नाशिकचे तेजपाल सिंह सोढा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तापोवनात हनुमान मंदीरात पंडित मिश्रा यांच्या हस्ते पूजन करत चंद्रयान ३ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली.
चंद्रयान ३ आपल्या देशाच्या संशोधन क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असून सर्व भारतीयांच्या याकडे नजरा लागून आहे. ही योजना यशस्वी होऊन भारत जागतिक पातळीवर आपला वेगळा ठसा उमटविणार आहे. त्यासाठी क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने हनुमान मंदिरात पूजा करत प्रार्थना करण्यात आली अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजपाल सिंह सोढा यांनी दिली.