सिन्नरच्या रस्त्यांवर जय ज्योती, जय क्रांतीचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 09:05 PM2021-01-04T21:05:27+5:302021-01-05T00:07:16+5:30
सिन्नर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली होती. यावेळी ह्यमुलगी शिकली प्रगती झाली, जय ज्योती जय क्रांती, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, बेटी बचाव बेटी पढाव गजर करीत जनजागृती करण्यात आली.
नगर परिषद कार्यालय येथून निघालेली रॅली वावीवेस, छत्रपती शिवाजी चौक, गणेश पेठ, नेहरू चौक यामार्गे बसस्थानक येथील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. यावेळी माझी वसुंधरा अभियानांतर्गत शपथ घेण्यात आली. नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अनिल जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी गटनेते हेमंत वाजे, विरोधी पक्षनेते नामदेव लोंढे, नगरसेवक प्रणाली गोळेसर, ज्योती वामने, नगरसेवक श्रीकांत जाधव, रूपेश मुठे, उदय गोळेसर, संतोष तेलंग, दत्ता बोऱ्हाडे, शुभम घुगे, हवालदार वसंत जाधव, भगवान शिंदे, समाधान बो-हाडे, अप्पासाहेब काकड, कृष्णा कोकाटे, कार्यालय निरीक्षक नितीन परदेशी, स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख, कैलास शिंगोटे, दीपक भाटजिरे, कल्पेश उगले, राहुल आहेर, ताहीर शेख, दीपक पगारे, अनुराधा लोंढे यांच्यासह गौतमी लोकसंचालित साधन केंद्राच्या क्षेत्रीय समन्वयिका प्रीती लोंढे, रोहिणी सोनवणे तसेच मेघा दराडे, कल्पना रेवगडे, संगीता सदगीर, कल्पना पाटील, रंजना बागुल, हर्षा खैरनार, वंदना जाधव, भारती शेपादे आदींसह बचत गटातील महिला, नागरिक उपस्थित होते. दरम्यान, शहरातील एस.जी. स्कूल, पांगरी येथील जिल्हा परिषद शाळा, आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले.