महिलेस ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आजन्म कारावास अन् दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 06:03 PM2019-01-30T18:03:06+5:302019-01-30T18:03:20+5:30

लासलगाव : ओझर येथील घर नावावर करण्याच्या कारणावरून कोयत्याने महिलेवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया नारायण म्हसु पिठे यास आजन्म कारावास व बारा हजार रूपये दंडाची शिक्षा निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी ठोठावली.

Jailed for trying to kill woman, sentenced to life imprisonment and punishment | महिलेस ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आजन्म कारावास अन् दंडाची शिक्षा

महिलेस ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आजन्म कारावास अन् दंडाची शिक्षा

Next
ठळक मुद्देबारा हजार रूपये दंडाची शिक्षा

लासलगाव : ओझर येथील घर नावावर करण्याच्या कारणावरून कोयत्याने महिलेवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया नारायण म्हसु पिठे यास आजन्म कारावास व बारा हजार रूपये दंडाची शिक्षा निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी ठोठावली.
निफाड तालुक्यातीलओझर येथील दहावा मैल येथील घर नावावर करण्याच्या कारणावरून कोयत्याने गंगुबाई विष्णू वाघ या महिलेवर वार करून दि. २३ मार्च २०१२ रोजी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार ओझरचे पोलिस उपनिरीक्षक एम. एम. भाटेकर यांनी तपास करून निफाड येथील सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. सरकारतर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील रमेश कापसे यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात दोषी धरून नारायण म्हसु पिठे यास आजन्म कारावास व सात हजार रूपये दंडाची व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी तसेच ५ वर्ष कारावास व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. शिक्षेची दहा हजार रूपये फिर्यादी महिलेस व दोन हजार रूपये शासनास भरणा करण्याचे आदेश दिले. या शिक्षेबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिर्मष्ठा वालावलकर यांनी समाधान व्यक्त केले व बक्षीस जाहीर केले. सरकारी पक्षाचे वतीने जिल्हा सहायक अभियोक्ता अ‍ॅड. रमेश कापसे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पोलिस उपनिरीक्षक कवडे व हवालदार एस. डी. आहेर यांनी सहाय्य केले.
(फोटो ३० क्राईम)

Web Title: Jailed for trying to kill woman, sentenced to life imprisonment and punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.