जेलरोड भागात कचऱ्याने दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 11:25 PM2020-02-08T23:25:58+5:302020-02-09T00:25:51+5:30
नाशिक : जेलरोड चलार्थपत्र मुद्रणालयाशेजारील बेला डिसूझा रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला असून, वाळलेल्या गवतात प्लॅस्टिक पिशव्या व ...
नाशिक : जेलरोड चलार्थपत्र मुद्रणालयाशेजारील बेला डिसूझा रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला असून, वाळलेल्या गवतात प्लॅस्टिक पिशव्या व घाण अडकल्याने दुर्गंधी पसरली आहे.
चलार्थपत्र मुद्रणालयाशेजारील बेला डिसूझा रस्त्याच्या एका बाजूला रहिवासी घरे आहेत. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा, प्लॅस्टिकच्या पिशव्या, घाण साचली आहे. रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या रहिवासी घरांचे सांडपाणी हे संरक्षक भिंतीकडून रस्त्याच्या कडेला बुजलेल्या गटारीत साचत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. बेला डिसूझा रस्त्याच्या स्वच्छतेकडे आरोग्य विभाग व घंटागाडी कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने बेला डिसूझा रस्त्याचे व परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे.