जैन आचार्य शिवमुनीश्रींचे सिन्नरला जोरदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 01:13 AM2019-05-19T01:13:27+5:302019-05-19T01:13:50+5:30
जैन धर्मीयांचे आचार्य डॉ. शिवमुनीश्री महाराज व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांचे शहरातील जैन बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. डॉ. शिवमुनीश्री यांच्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून जीवदयेसाठी सुमारे ७० हजार रु पये निधी जैन बांधवांच्या वतीने संकलित करण्यात आला असून, सदर निधी टंचाईग्रस्त भागात जनावरांच्या चारा व पाण्यासाठी तसेच गोशाळेसाठी खर्च करण्यात येणार आहे.
सिन्नर : जैन धर्मीयांचे आचार्य डॉ. शिवमुनीश्री महाराज व युवाचार्य महेंद्रऋषीजी महाराज यांचे शहरातील जैन बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात आले. डॉ. शिवमुनीश्री यांच्या दीक्षा दिनाचे औचित्य साधून जीवदयेसाठी सुमारे ७० हजार रु पये निधी जैन बांधवांच्या वतीने संकलित करण्यात आला असून, सदर निधी टंचाईग्रस्त भागात जनावरांच्या चारा व पाण्यासाठी तसेच गोशाळेसाठी खर्च करण्यात येणार आहे.
चतुर्मासानिमित्त गुजरातमधील कार्यक्रम आटोपून डॉ. शिवमुनीश्री यांच्यासोबत १८ ते २० जैन साधू अक्षय्य तृतीयेला उपवास सोडण्यासाठी नाशिकला आले होते. तेथे त्यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. नाशिकहून पुण्याकडे प्रस्थान ठेवताना सिन्नर, शिर्डी, अहमदनगर येथील जैन बांधवांना उपदेश करण्यासाठी हे मुनीवर पायी प्रवास करीत असून, शुक्र वारी (दि.१७) त्यांचे सिन्नर बसस्थानक येथे सिन्नर जैन श्रावक संघाच्या वतीने संघपती मनोज भंडारी, आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांनी स्वागत केले. शहरातील जैन बांधव यावेळी उपस्थित होते.