अंमळनेर घटनेचा जैन समाजाकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:41 AM2021-02-20T04:41:48+5:302021-02-20T04:41:48+5:30
अंमळनेर शहरात जैन समाजाचे विनय बागरेचा यांचे जैन धर्माची दिक्षा घेण्याच्या कार्यक्रमाचे बॅनर व होर्डिंग लावण्यात आलेले ...
अंमळनेर शहरात जैन समाजाचे विनय बागरेचा यांचे जैन धर्माची दिक्षा घेण्याच्या कार्यक्रमाचे बॅनर व होर्डिंग लावण्यात आलेले होते. सदर बॅनर व होर्डिंग रात्रीच्या वेळी कोणतीही पूर्वसूचना न देता, अंमळनेर नगरपलिकेच्या सहायक मुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी हटविले, तसेच जैन समाजाबद्दल अपशब्द वापरले. यामुळे समाजात संतापाची लाट उसळल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे. सदर प्रकरणी चौकशी होऊन संबंधित सहायक मुख्याधिकारी गायकवाड यांना तत्काळ निलंबित करावे, असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे. निवेदनावर ओसवाल जैन समाजाचे उपाध्यक्ष सतीश समदडिया, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष अरुण सोनी, मदनलाल चंडालिया, अल्केश कासलीवाल, रवींद्र बाफणा, हर्षल छाजेड, दिनेश बाफणा, जितेश जैन, प्रवीण श्रीश्रीमाळ, विजय संचेती, सुभाष पारख, उमेदमल श्रीश्रीमाळ आदींसह समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो- १९ येवला जैन
अंमळनेर येथील घटनेचा निषेध करत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देताना, सकल जैन समाज व भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी.
===Photopath===
190221\19nsk_52_19022021_13.jpg
===Caption===
फोटो- १९ येवला जैनअंमळनेर येथील घटनेचा निषेध करत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देताना सकल जैन समाज व भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी.