जैन दीक्षार्थी रुचिता सुराणा यांची घोटीत शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 05:24 PM2018-12-14T17:24:56+5:302018-12-14T17:25:09+5:30
शनिवारी सोहळा : विविध मान्यवरांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : येथील अशोक सुराणा यांची एकुलती एक कन्या रु चिता सुराणा यांनी जैन समाजाचे दीक्षा व्रत अंगिकारत असून त्या पार्श्वभूमीवर शुक्र वारी(दि.१४) शहरातून शोभा यात्रा काढण्यात आली. शनिवारी (दि.१५) दीक्षा अंगिकार समारंभ होणार आहे.
शुक्रवारी सकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरुन रु चिता सुराणा यांची त्यांच्या मातापित्यासोबत शोभायात्रा काढण्यात आली. रु चिता सुराणा हिने गृहस्थाश्रमाचा त्याग केला असून शनिवारी घोटी येथील जैन भवनाच्या प्रांगणात दीक्षा विधीस सुरवात होणार आहे. रु चिता सुराणा या पंकज मुनीजी म.सा. यांच्या सानिध्यात जैन दीक्षा ग्रहण करणार आहेत . त्यानिमित्त जैन स्थानकापासून भंडारदरा रोड मार्गे जैन भवन पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जैन भवन येथे शोभायात्रेची सांगता झाली. त्यानंतर गुरु महाराजांचे दीक्षा या विषयावर प्रवचन झाले. तसेच विविध मान्यवरांच्यावतीने रु चिता सुराणा यांच्यासह त्यांच्या मातापित्याचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्र म झाला.
यावेळी जैन समाजाचे संघपती नंदकुमार सिंघवी, माजी संघपती किसनलाल पिचा, उमेद पिचा, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, संजय चोरडिया, विजय कर्नावट, नवसुखलाल पिचा, डॉ. चोरडिया, दिपक चोरडिया, प्रवीण पिचा, रवींद्र गोठी, अविनाश गोठी, ललित पिचा, सचिन लोढा, तुषार बोथरा, पंकज भंडारी, पारस चोरडिया आदी उपस्थित होते. ईश्वर चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.