जैन संस्थेने गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम पिढी घडविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 06:18 AM2019-01-07T06:18:53+5:302019-01-07T06:19:38+5:30

राजेंद्र दर्डा; चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या विविध शाखांच्या इमारतींचे उद्घाटन

Jain organization has created quality, sentimental generation | जैन संस्थेने गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम पिढी घडविली

जैन संस्थेने गुणवत्तापूर्ण, संस्कारक्षम पिढी घडविली

googlenewsNext

चांदवड : येथील श्री. नेमिनाथ जैन ब्रम्हचर्याश्रम संस्थेने ज्ञानदानाबरोबरच गुणवत्ता, चारित्र्य व संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम केले ही कौतुकास्पद बाब असून संस्थापक पूज्य केशवलाल हरकचंद आबड यांनी अवघ्या चार विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या या संस्थेचे आज ९० व्या वर्षी वटवृक्षात रुपांतर झाले आहे. गुरुकुल पद्धतीने शिक्षण देताना उत्कृष्ट वसतीगृह, के. जी. ते पी.जी.पर्यंत शिक्षणांचा वसा घेताना गुणवत्तेत तडजोड न केल्यामुळेच संस्थेने दखलपात्र काम उभे केले आहे. त्याच बळावर या संस्थेच्या जैन विद्यापीठाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास सकल जैन समाजाचे अध्यक्ष आणि लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला.

संस्थेची नवनिर्मित महाविद्यालय इमारत, विविध शाखेच्या विभागांचे उद्घाटन, प्रवेशद्वाराचे नामकरण तसेच दानशूर समाजबांधवांच्या सन्मान समारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त संपतलाल सुराणा होते. प्रमुख अतिथी म्हणून लासूर स्टेशनचे आमदार प्रशांत बंब, औरंगाबादचे आमदार सुभाष झांबड, नाशिकरोडचे मोहनलाल चोपडा, मालेगावचे विजयकुमार लोढा, मुंबईचे सी. बी. छाजेड, जयपूरचे लाभचंद कोठारी, चांदवडचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, अविनाश चोरडिया, पारसमल मोदी (जैन), अशोक जैन आदी उपस्थित होते.

हमने सोचा हम ही चाहते है आपको, पर आपको चाहनेवालो का काफीला निकाला, मैने कहा चलकर शिकायत खुदा से, पर वो खुदा भी आपका चाहनेवाला निकला, असे सांगत दर्डा म्हणाले, या २८ एकर निसर्गाच्या सान्निध्यात ९० वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षणप्रेमी संस्थाचालक हे गुणवत्ता तत्त्वावर विद्यार्थ्यांना प्रवेश देतात, हे मोठे काम आहे. प्रांरभी नुतन इमारती व विविध शाखांचे उद्घाटन व नामकरण करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष संपतलाल सुराणा यांनी ९२ व्या वर्षात पदार्पण केल्याने त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रबंध समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार मिळाल्याबद्दल तर मुंबई येथील पारसमल बुधमल जैन (मोदी) यांची श्री. आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेस, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.

दात्यांचा सत्कार
जीवन रविंद्र संचेती (वैजापूर), राजेंद्र बोरा (पुणे), रमेशजी फिरोदिया (अहमदनगर), मदनलाल पारसमल, अशोकजी, ललीतजी, गौतमजी साखला (नाशिक), अनिल खिवंसरा (मुंबई), शोभाचंद संचेती (वैजापूर), हुकुमचंद पारख (नांदगाव), अरविंद भन्साळी (कोपरगाव), रविंद्र शिंगी (कोपरगाव) आदी दात्यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Jain organization has created quality, sentimental generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.