जैन शाळेत पक्षी संवर्धन पूरक उपक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 06:44 PM2019-04-08T18:44:54+5:302019-04-08T18:46:32+5:30
लासलगाव : पृथ्वीतलावरील काही प्राण्यांप्रमाणेच पक्षांचेही अस्तित्व कमी होताना दिसत आहे. पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलिबलाट हळूहळू कमी होत आहे. याचेच गांभीर्य लक्षात घेवून येथील जैन प्राथमिक शिक्षण मंदिर या शाळेमध्ये पक्षी संवर्धन पूरक ‘मुठभर दाणी घोटभर पाणी’ उपक्र म घेण्यात आला.

विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने उपक्र मात सहभागी होण्यासाठी साहित्याची जमवाजमव केली. उपक्र मासाठी त्र्यंबक उपाध्ये आणि दिनेश पटेल यांनी प्रमुख उपस्थिती दाखवून पक्ष्यांसाठी बर्ड-फिडरची सोय करून दिली. जव्हेरीलाल ब्रम्हेचा, शांतीलाल जैन, महावीर चोपडा, मोहनलाल बरिडया, सुनील आब्बड, अमित जैन तसेच मुख्याध्यापक नलिनी शिंदे आदींनी विद्यार्थ्यांनासहकार्य केले.
त्र्यंबक उपाध्ये यांनी पक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवावे यासाठी पक्षी संवर्धन या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे शिक्षक नवनाथ ठाकरे यांनी उपक्र माची माहिती सांगितली. यासाठी शाळेतील शिक्षक गणेश महाले, लिनीता अहिरे, मनीषा पाटील, तुषार जैन, महेश खैरनार, सतीश गाडे, उमेश कापडणीस, विलास पवार, किरण पाचपुते, नरेंद्र हांडगे, श्रीमती चव्हाण, श्रीमती अहिरे आदींनी परिश्रम घेतले.