जैन शाळेत ‘मुठभर दाणी घोटभर पाणी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 02:33 PM2019-04-05T14:33:00+5:302019-04-05T14:33:13+5:30
लासलगाव : पृथ्वीतलावरील काही प्राण्यांप्रमाणेच पक्षांचेही अस्तित्व कमी होताना दिसत आहे .पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलबिलाट हळूहळू कमी होत ...
लासलगाव : पृथ्वीतलावरील काही प्राण्यांप्रमाणेच पक्षांचेही अस्तित्व कमी होताना दिसत आहे .पूर्वी ऐकू येणारा पक्षांचा किलबिलाट हळूहळू कमी होत चालला आहे. याचेच गांभीर्य लक्षात घेत जैन प्राथमिक शिक्षण मंदिर लासलगाव या शाळेमध्ये ‘मुठभर दाणी घोटभर पाणी’ हा पक्षी संवर्धन पूरक उपक्र म राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने उपक्र मात सहभागी होण्यासाठी साहित्याची जमवाजमव केली.उपक्र मासाठी त्र्यंबक उपाध्ये आणि दिनेश पटेल यांनी प्रमुख उपस्थिती दाखवून पक्षांसाठी बर्ड- फिडरची सोय करून दिली. संस्थेचे कार्याध्यक्ष जव्हेरीलाल ब्रम्हेचा, मानद सचिव शांतीलाल जैन ,जैन शाळेचे अध्यक्ष महावीर चोपडा, विश्वस्त मोहनलाल बरडिया, सुनील आब्बड, अमित जैन, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी शिंदे उपस्थित होते. त्रंबक उपाध्ये यांनी पक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवावे यासाठी पक्षी संवर्धन या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक नवनाथ ठाकरे यांनी उपक्र माची माहिती सांगितली. उपक्र मासाठी शाळेतील शिक्षक गणेश महाले, लिनीता अहिरे, मनीषा पाटील, तुषार जैन, महेश खैरनार, सतीश गाडे, उमेश कापडणीस, विलास पवार,किरण पाचपुते ,नरेंद्र हांडगे,श्रीमती चव्हाण, श्रीमती अहिरे आदींनी परिश्रम घेतले.