जेवणाचे डबे वाटून जैन सोशल ग्रुपने केली महावीर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 08:22 PM2020-04-06T20:22:19+5:302020-04-06T20:25:05+5:30
देवळा : देवळा तालुका जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी, शेतमजूर व हातावर काम करणाऱ्या लोकांना जेवणाचे डबे वाटप करीत अभिनव पद्धतीने साजरी भगवान महावीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
देवळा : देवळा तालुका जैन सोशल ग्रुपच्या वतीने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी, शेतमजूर व हातावर काम करणाऱ्या लोकांना जेवणाचे डबे वाटप करीत अभिनव पद्धतीने साजरी भगवान महावीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सोशल डिस्टिन्संगचे काटेकोर पालन करण्यात आले. जगभरात करोना विषाणूंच्या संसर्गाने हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याचे सावट भारतावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी भारत सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. संचारबंदी असल्याने पोलीस प्रशासन रस्त्यावर सेवा बजावत असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतमजूर, हातावर पोट भरणारे नागरिक यांना रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
या लोकांप्रती सामाजिक दायित्व म्हणून भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने होणाºया हजारो रु पयांच्या खर्चाला आळा घालून त्या पैशातून अन्न वाटप करण्याचा निर्णय देवळा तालुका जैन सोशल ग्रुपच्या वतीने घेण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे नगर, एकलव्य नगर, इंदिरानगर, देवळा पोलीस स्टेशन येथे जेवणाचे डबे तयार करकुन त्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी जैन समाजाचे संघपती जसराज सुराणा, उपनगराध्यक्ष अतुल पवार, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख, उपनिरीक्षक संजय मातोंडकर, रवींद्र मल्ले, सुराणा पतसंस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अशोक सुराणा, सचिन सुराणा, अभय संकलेचा, राजू सोनी, राहुल लुंकड, भूषण कर्नावट, रोहित सुराणा, साखरचंद गेलडा, चंदू गेलडा, वैभव ओस्तवाल, अतिश कर्नावट, अनिल गांगुर्डे आदींसह समाज बांधव उपस्थित होते.