जाखोरीकरांनी भागवली चिखलवाडीची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:20 AM2019-01-22T01:20:33+5:302019-01-22T01:20:49+5:30

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाखोरी गावाने सामाजिक बांधिलकी जोपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी गावाची तहान भागविली आहे. गावातील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयाने याकामी पुढाकार घेतला.

 Jakhorikar foresaw the thirst for the chikhalwadi | जाखोरीकरांनी भागवली चिखलवाडीची तहान

जाखोरीकरांनी भागवली चिखलवाडीची तहान

Next

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाखोरी गावाने सामाजिक बांधिलकी जोपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी गावाची तहान भागविली आहे. गावातील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयाने याकामी पुढाकार घेतला.  जाखोरी येथील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयातर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक उपक्रम राबविले जातात. वाचनालयाचे अध्यक्ष सुहास खाडे, सचिव देवीदास राजपूत, संदीप बनकर, अमोल मगर, विश्वास कळमकर, सरपंच सुनीताताई कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा-वीस दिवसांपूर्वी वाचनालयाच्या या पदाधिकाºयांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील लहान-मोठ्या पाड्यांना भेट देऊन तेथील नागरिकांच्या समस्या व अडीअडचणी समजून घेतल्या. त्यावेळी पहिने गावाच्या परिसरातील चिखलवाडी येथील महिलांना डोक्यावर हंडा घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याचे निदर्शनास आले. या महिलांची पायपीट थांबावी म्हणून विचारक्रांती वाचनालयाच्या माध्यमातून चिखलवाडी पाड्यावर पिण्याचे पाणी साठविण्यासाठी एक हजार लिटरची टाकी बसविण्यात आली. चिखलवाडी पाड्यापासून लांबवर असलेल्या विहिरीवर जलपरी बसवून, पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन टाकून टाकीत पाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली.  जाखोरीच्या विचारक्रांती वाचनालयाच्या या सामाजिक उपक्रमाचे पहिने गावचे सरपंच काशीनाथ डगळे, किसन वारघडे, साळू वारघडे, हिरामण खांडवी, संगीता बाजाड, नारायण धनगर आदींनी कौतुक केले आहे.

Web Title:  Jakhorikar foresaw the thirst for the chikhalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.