पुरुष हक्क समितीचे जळगावला अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:58 AM2018-11-21T00:58:43+5:302018-11-21T00:59:13+5:30
पुरुष हक्क संरक्षण समितीचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी जळगाव येथे होणार असून या अधिवेशना नामवंत कायदेतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत़ या अधिवेशनात कौटुंबिक अन्यायकारक कायद्यात बदल आणि पुरुष आयोगाची स्थापनेची मागणी केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ़ सुनील घाडगे, सचिव अॅड़धर्मेंद्र चव्हाण, जळगावचे अध्यक्ष अॅड. जयेश भावसार, अॅड. प्रवीण येवले यांनी दिली आहे़
नाशिक : पुरुष हक्क संरक्षण समितीचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी जळगाव येथे होणार असून या अधिवेशना नामवंत कायदेतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत़ या अधिवेशनात कौटुंबिक अन्यायकारक कायद्यात बदल आणि पुरुष आयोगाची स्थापनेची मागणी केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ़ सुनील घाडगे, सचिव अॅड़धर्मेंद्र चव्हाण, जळगावचे अध्यक्ष अॅड. जयेश भावसार, अॅड. प्रवीण येवले यांनी दिली आहे़
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विविध कायदेविषयक चर्चासत्र, कौटुंबिक अन्यायकारक कायदे, महिलांकडून होणारा कायद्यांचा दुरुपयोग, मिटू याविषयी अॅड. नितीन सातपुते (मुंबई), वास्तव संस्थेचे अमित देशपांडे (मुंबई), पत्नी पीडित पुरुष संघाचे भरत फुलारे (औरंगाबाद), अॅड. बाळासाहेब पाटील (सांगली), अॅड. दिलीप तेली (मुंबई), अॅड. नामदेव साबळे (बीड), अॅड. शिवाजीराव कराळे (नगर), आप्पासाहेब कोकितकर (कोल्हापूर), अॅड. संतोष शिंदे (पुणे), अॅड. मधूकर भिसे (धूळे), अॅड. सचिन थोरात (औरंगाबाद), अॅड. शैलजा केळकर (पुणे), अॅड. विशाल सोनार (नंदुरबार) हे कायदेतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनात महिलांसाठी विशेष चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.