जळगाव बु. शाळेत सन्मान लेकीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:55 PM2019-12-29T23:55:59+5:302019-12-29T23:56:20+5:30
जळगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त अभियानांतर्गत ‘करू या सन्मान लेकीचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नांदगाव : तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त अभियानांतर्गत ‘करू या सन्मान लेकीचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राणी लक्ष्मीबाई, माता जिजाऊ , क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी आदी कर्तबगार महिला नेतृत्वाच्या व त्यांच्या जीवनावर व कामगिरीवर आधारित विविध वेशभूषा परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी गावातून प्रभातफेरी काढली. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ घोषणा देत निघालेल्या या फेरीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या फेरीच्या अग्रभागी झाशीची राणीच्या वेशभूषेत घोड्यावर स्वार झालेले विनता गावंडे ही विद्यार्थिनी गावकऱ्यांचा कौतुकाचा विषय बनली. कावेरी कांदे, जयश्री गिते यांनी मी सावित्रीची लेक या विषयावर मनोगत व्यक्त केले.
अंगणवाडी, माध्यमिक शाळेचे विद्यार्थीदेखील यात सहभागी झाले होते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या या उपक्रमाला गावातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. मुख्याध्यापक राजेंद्र काटकर, बाबर यांचे सहकार्य लाभले. छाया बोरसे, संगीता सोनवणे, कविता रोकडे, शैलेश टिळेकर, वर्षा थोरात, मंगल घुगे, मनोज धात्रक आदी उपस्थित होते.
‘मुलगा-मुलगी एक समान, करू या लेकीचा सन्मान’, मुलींच्या शिक्षणाची गळती थांबवणे आदी विविध विषयांवर पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थिनीच्या घराच्या दारावर तिच्या नावाची पाटी लावण्यात आली.