जळगाव नेऊरला नाशिक औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 03:36 PM2018-08-09T15:36:45+5:302018-08-09T15:42:14+5:30
जळगाव नेऊर:सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज ९आँगस्ट क्र ांतीदिनी जळगाव नेऊरला कडकडीत बंद पाळुन नाशिक औरंगाबाद महामार्गावर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
जळगाव नेऊर:सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज ९आँगस्ट क्र ांतीदिनी जळगाव नेऊरला कडकडीत बंद पाळुन नाशिक औरंगाबाद महामार्गावर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या आंदोलनात सर्वच समाजातील बांधवांनी पाठिंबा देत ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला, यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ यांनी ठिय्या आंदोलनाला संबोधित केले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असुन ,गेली दोन वर्षापासून हा समाज लढा देत असुन मुख्यमंत्र्यांनी त्विरत आरक्षणाची मागणी मान्य करावी असे ते म्हणाले.तसेच बाबा थेटे, शिवाजी तांबे यांनी हि मराठा आरक्षणाबाबत विचार व्यक्त केले.यावेळी मराठा आरक्षणाची प्रक्रिया पुर्ण करावी, आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घ्यावे, धुळे नंदुरबार प्रकरणातील अॅक्ट्रासिटीचे गुन्हे मागे घ्यावेत. येवल्यात शिवश्रृष्टी निर्माण करावी या मागण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना देण्यात आले.याप्रसंगी बाळासाहेब शिंदे, वसंत शिंदे, अशोक दाते,नवनाथ शिंदे, एल.जी.शिंदे, कोंडाजी शिंदे, सूर्यभान झांबरे,प्रविण शिंदे, सचिन शिंदे, सोमनाथ तांबे,प्रकाश शिंदे, आबासाहेब घुले,सुकदेव भुसे,चंद्रभान गुंड, दिनकर शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,सोयब शेख,राहुल राजगुरु , महेश काळे,गणेश तांबे,राहुल कुराडे,साहेबराव ठोंबरे,दिनकर वाळके, ऋ षिकेश शिंदे,विकि गुळे,तुषार शिंदे,सर्जेराव सोनवणे, संतोष राजगुरू, यांच्यासह शेकडो तरु ण उपस्थित होते.