जळगाव नेऊरला पावसाने लष्करी अळीच्या प्रमाणात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 08:27 PM2020-07-09T20:27:17+5:302020-07-10T00:25:31+5:30
जळगाव नेऊर : परिसरात झालेल्या पावसाने मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक मानली जात आहे.
जळगाव नेऊर : परिसरात झालेल्या पावसाने मका पिकावरील लष्करी अळीच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही बाब दिलासादायक मानली जात आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा ऐन मोसमात पाऊस सुरू राहिल्याने लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यामुळे मका पिकाची जोमात वाढ होत असून शेतकऱ्यांचा औषधांचा खर्चही कमी होत आहे. कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी, कापूस पिकावरील बोड अळीबाबत प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले.
नेमुरिया रिलाईसारखी जैविक औषधे, कामगंध सापळे यांचा वापर केल्याने तसेच वेळेवर सलग दोन तीन दिवस पाऊस झाल्याने या वर्षी अळी नियंत्रणात आल्याचे कृषी सहाय्यक साईनाथ कालेकर यांनी सांगितले.
तरी देखील अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास औषधे फवारणी अवश्य घ्यावी असेही कृषी सहाय्यक राहूल जगताप यांनी सांगीतले.
----------------------
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी लष्करी अळीचे प्रमाण पन्नास टक्के कमी आहे.मकावर अळीचे प्रमाण कमी असून जोराचा पाऊस झाल्याने लष्करी अळीचे प्रमाण कमी झाले आहे. - विकास गायकवाड