जळगाव निं. उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:47 PM2018-02-13T23:47:44+5:302018-02-13T23:50:28+5:30
जळगाव निं. : गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश पाहता शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेच कमी नाही.
जळगाव निं. : गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश पाहता शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेच कमी नाही, असे प्रतिपादन मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन विकास अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले. तालुक्यातील जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष कासूताई पाटील होत्या. शिंदे यांनी तालुक्यातील पाथर्डे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी पदापर्यंतचा आपला जीवन प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. यावेळी अमोल अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मान्यवरांशी संवाद साधला. कार्यक्रमास संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, खजिनदार बाळासाहेब दुकळे, संस्थेचे सर्व संचालक, विश्वस्त, पदाधिकारी, प्राचार्य आर. आर. बागल, पर्यवेक्षक जी. एस. फसाले, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थासह विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य आर. आर. बागल यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. पी. यू. शिंदे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सी. डी. राजपूत यांनी केले. डी. एस. जमधाडे यांनी आभार मानले.