पुणेगाव पाटाचे जलपूजन
By admin | Published: September 9, 2016 01:07 AM2016-09-09T01:07:06+5:302016-09-09T01:07:27+5:30
पालकमंत्री महाजन : दोन वर्षात पाणी योजना मार्गी लावण्याचा मानस
चांदवड : तालुक्यातील परसूल येथे पुणेगाव पाटाच्या पाण्याचा जलपूजन समारंभ जलसंपदामंत्री - पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून, येत्या दोन वर्षाच्या कालावधीत चांदवड-देवळा मतदारसंघातील पाणी योजनांसह अपूर्ण योजना पूर्ण करण्याचा मानस असल्याची ग्वाही महाजन यांनी यावेळी दिली.
अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल अहेर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, तालुकाध्यक्ष सुनील शेलार, अशोक भोसले, विलास ढोमसे, बाळासाहेब वाघ, निवृत्ती घुले, कारभारी अहेर, नितीन अहेर, तुकाराम सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी भाजपा चांदवड तालुकाच्या वतीने परसूल, तिसगाव, हिवरखेडेमार्गे आहेरखेडे - पिंपळगाव ढाबळी येथील परसुली नदीत पाणी टाकण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदनात हत्तीपाडा, कालडोह व हायराईज कॅनालला त्वरित मंजुरी द्यावी व दुष्काळ निवारण्याची हीमागणी निवेदनात केली आहे. या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र दवंडे, प्रभाकर ठाकरे, बाळासाहेब वाघ, अॅड. शांताराम भवर, निवृत्ती घुले, शरद अहेर, राजेंद्र वानखेडे, सुमनताई वाघ, बेबीताई पोटे, ताईबाई उशीर, विजय पवार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)