गायत्री परिवाराकडून जलकलश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:59+5:302021-03-05T04:14:59+5:30
जेडीसी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन, त्याचप्रमाणे ...
जेडीसी इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन
नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या जेडीसी बिटको इंग्लिश मीडियम विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन, त्याचप्रमाणे मराठी दिन साजरा करण्यात आला. यावेळी विज्ञानविषयक प्रश्नमंजूषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक जे.एन. खैरनार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात सी.व्ही. रमण आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमापूजनाने झाली.
जीवक फाउंडेशनच्या वतीने पुस्तक प्रकाशन
नाशिक : डॉ. संजर दामू जाधवलिखित ‘धडपड सालदाराच्या पोराची’ व ‘संघर्ष वाटा’ या पुस्तकांचे प्रकाशन येत्या ७ रोजी मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात होणार आहे. या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित राहाणार असल्याची माहिती जीवक फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली.
दुकानांसमोरून दुचाकी चोरीचे प्रकार
नाशिक : पार्किंगमध्ये उभी केलेली दुचाकी चोरीस जाण्यचे प्रकार अनेकदा घडतात; परंतु दुकानासमोर दुचाकी उभी करून वस्तू घेण्यासाठी ग्राहक जाताच त्याची दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना घडत आहेत. गर्दीच्या दुकानांसमोर चोरटे सावज शोधत असल्याचे अशा घटनांवरून दिसून येते.
मुलींच्या विकासाबाबत ऑनलाइन व्याख्यान
नाशिक : ‘कोविडच्या काळात मुलींचा सर्वांगीण विकास’ या विषयावर डॉ. श्रुती पालखेडकर यांचे ऑनलाइन व्याख्यान पार पडले. भुजबळ नॉलेज सिटी येथील संगणक विभागाच्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कुमार वयातील मुलींनी कशी काळजी घ्यावी, पोषक अन्नपदार्थ याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रा. शुभांगी हळकुंड, रवींद्र माणके यांनी परिश्रम घेतले.
दिव्य आकांक्षातर्फे मराठी स्वाक्षरी मोहीम
नाशिक : दिव्य आकांक्षा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मराठीत सही करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मंगल खैरनार, सिंधू जगताप, जयश्री हिंगे, गीता पवार, सीता धोंगडे, अशोक खैरनार, मयूर शर्मा, भाऊराव पाटील आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रीय रिपब्लिकनतर्फे अभिवादन
नाशिक : राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने श्री काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन करण्यात आले. पक्षाचे नेते अण्णासाहेब कटारे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मंदिर सत्याग्रह आंदोलन आंबेडकरी चळवळीतील ऐतिहासिक घटना असल्याचे कटारे म्हणाले.