त्र्यंबक तालुक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 08:54 PM2021-01-18T20:54:58+5:302021-01-19T01:32:43+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील पेगलवाडी, विजयनगर तथा डहाळेवाडी व शिवाजीनगर या तीन ग्रामपंचायतींच्या ११ जागांचे निवडणुकांचे निकाल लागले आहेत. तर पेगलवाडी ना. येथील प्रभाग क्र.१ बिनविरोध, शिवाजीनगर येथील प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र. ३ यापूर्वीच बिनविरोध झाले.

पेगलवाडी ना. : प्रभाग क्र.१ - गोकुळ निंबेकर,कविता झोले, पदमा झोले, प्रभाग क्र.२- रवींद्र झोले , छाया बदादे, सुरेश उजे, रेखा झोले
विजयनगर तथा डहाळेवाडी : प्रभाग १ प्रकाश खाडे, उषा डहाळे, शोभा पाडेकर, प्रभाग क्र.२ : ईश्वर भांडकोळी, नंदा वाघ, निलेश जाखेरे, शकुंतला वाघ या तिन्हीही गावच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तरी यशस्वी व शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी शिवाजीनगरचे आनंदराव बेंडकोळी, नारायण बेंडकोळी, पेगलवाडीचे काळु उजे, मनसेचे नवनाथ कोठुळे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी सहकार्य केले. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक टिळे, लोखंडे, आदींसह हवालदार संजय खैरनार आदींनी पोलीस बंदोबस्त ठेवला.
शिवाजीनगर : प्रभाग १- राजु बेंडकोळी, सगुणा आचारी, पार्वता बेंडकोळी, प्रभाग क्र.२ युवराज बेंडकोळी, सखुबाई बेंडकोळी, प्रभाग .३ -पंढरीनाथ बेंडकोळी, हिराबाई बेंडकोळी
(१८ टीबीके १)