अंबोली, अहल्या धरणांचे जलपूजन

By admin | Published: July 11, 2016 11:20 PM2016-07-11T23:20:42+5:302016-07-11T23:27:51+5:30

अंबोली, अहल्या धरणांचे जलपूजन

Jalpujan of Amboli, Ahilya Dam | अंबोली, अहल्या धरणांचे जलपूजन

अंबोली, अहल्या धरणांचे जलपूजन

Next

 त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहरात रविवारी पूर आल्याने तेली गल्ली, बोहरपट्टी, नगरपालिका कार्यालय, अमृतकुंभासमोर आदि ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. श्रद्धाळू महिलांनी गोदामाईची खणानारळाने ओटी भरली. अहल्या-गोदावरी संगम घाटावर पुलाला पाणी लागले होते. पाण्याचा वेग प्रचंड होता. येथे गोदामाई अदृश्य स्वरूपात होती ती श्रीरामाने बाण मारून दृश्य स्वरूपात आणल्याचे सांगितले जाते, त्या चक्रतीर्थाजवळ गोदामाईचे रौद्ररूप पाहावयास मिळाले. गोदावरीने त्या ठिकाणी गोल फिरत नाशिककडे प्रयाण केले. या ठिकाणी गोदावरीचे स्वरूप पाहिल्यावर नाशिकला किती पूर आला असावा याची कल्पना येते. जाणकारांनी सांगितले, असा पूर आम्ही कधी पाहिला नव्हता. जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते तरी पाऊस थांबण्याची चिन्हं दिसत नव्हती. अंबोली धरण परिसरात पडलेल्या दाट धुक्याने जवळचेही दिसत नव्हते. वाहनचालक दिवे लावून वाहने चालवित होते. संपूर्ण अंबोली धरण धुक्यात हरवले होते. धरण पूर्णपणे भरले आहे. आता पालिकेने गावात नियमित दररोज पाणी सोडण्यास हरकत नसावी. ठिकठिकाणी निसर्गाची व पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक सहकुटुंब आले होते. पहिणे शिवारातील बिअर शॉपी आज बंद ठेवण्यात आली होती. तरीही काही जण तेथे डोकावत होते. या परिसरातील ढाबे खवय्यांसाठी प्रसिद्ध असल्याने जवळपास ९ ते १० ठिकाणी घरगुती पद्धतीने मटनाची भाजी, बाजरीची भाकरी, जोडीला भात, ठेचा वगैरे जेवणाचा थाट या ठिकाणी असतो. अर्थात शाकाहारांसाठीदेखील वेगळी व्यवस्था असते. सुटी असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला घेऊन वीकेण्ड साजरा करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असतो.
त्र्यंबकेश्वर हे पर्यटनस्थळ म्हणून पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. मात्र आता ब्रह्मगिरी-गंगाद्वार तसेच पहिणे परिसर व दुगारवाडी धबधबा चांगल्या प्रकारे विकसित व्हावा, अशी पर्यटकांची मागणी त्यांनी बोलून दाखविली. (वार्ताहर)

Web Title: Jalpujan of Amboli, Ahilya Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.