भावली धरणाचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:45 AM2017-07-23T00:45:40+5:302017-07-23T00:46:18+5:30

भावली धरण गेल्या पाच दिवसांपूर्वी पूर्णपणे भरल्याने आज या धरणाचे विधिवत शासकीय जलपूजन आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

Jalpujan of the Bhavali Dam | भावली धरणाचे जलपूजन

भावली धरणाचे जलपूजन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घोटी : इगतपुरी तालुक्याचे भूषण असलेल्या व तालुक्यातील पाण्याची तहान भागविणारे, पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या संपूर्ण तालुक्याची पिण्याच्या पाण्याची मदार अवलंबून असलेले भावली धरण गेल्या पाच दिवसांपूर्वी पूर्णपणे भरल्याने आज या धरणाचे विधिवत शासकीय जलपूजन आमदार निर्मला गावित यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी या धरणाच्या पाणीसाठ्याबाबत आढावा घेऊन या धरणातील पाण्याचा पूर्ण तालुक्याला लाभ होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या व हे धरण पर्यटनासाठी अव्वल असल्याने हा धरण परिसर सुशोभीत करून जनतेसाठी चांगल्या दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होण्यासाठी आपण प्राधान्य देऊ, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. आज या भावली धरणाचे जलपूजन आमदार निर्मला गावित, कार्यकारी अभियंता आर. एस. शिंदे, रमेश गावित, तहसीलदार अनिल पुरे, कार्यकारी शाखा अभियंता सुहास पाटील, पांडुरंग शिंदे, भास्कर गुंजाळ, पंकज माळी, गुलाब वाजे, साहेबराव धोंगडे, कैलास घारे, जगन शेलार, विजय कडू, मंजुळा भले, त्र्यंबक गुंजाळ, सोमनाथ जोशी, सामाजिक कार्यकर्त्या आशा शिंदे, किरण फलटणकर, साहेबराव धोंगडे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.
उत्तर महाराष्ट्रात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सर्वप्रथम इगतपुरी तालुक्यातील भावली धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले. यावेळी तात्या भागडे, स्वीय सहायक योगेश चोथे, राजेंद्र जाधव, शांताराम क्षीरसागर, यशवंत वालझाडे, भास्कर गुंजाळ, गुलाब वाजे आदी सदर कार्यक्रमप्रसंगी उपस्थित होते.



 

Web Title: Jalpujan of the Bhavali Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.