चिंचोडी बुद्रुक येथील बंधाऱ्यावर महिलांच्या हस्ते जलपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:24 IST2019-06-23T18:22:37+5:302019-06-23T18:24:11+5:30
चिचोंडी बुद्रुक येथील बेंद नाल्यावरील बंधा-याच्या खोलीकरणाचे व रूंदीकरणाचे काम गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार योजनेतून टाटा ट्रस्ट, युवा मित्र ,महाराष्ट्र शासन, ग्रामपंचायत, शिवयोध्दा सोशल फाऊंडेशनच्या सहकार्यांने नुकतेच पुर्ण झाले. काल झालेल्या पहिल्याच पावसाने तुडूंब भरून वाहु लागल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत झाले असून महिलांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.

चिंचोडी बुद्रुक येथील बंधाऱ्यावर महिलांच्या हस्ते जलपूजन
जळगाव नेऊर : चिचोंडी बुद्रुक येथील बेंद नाल्यावरील बंधा-याच्या खोलीकरणाचे व रूंदीकरणाचे काम गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार योजनेतून टाटा ट्रस्ट, युवा मित्र ,महाराष्ट्र शासन, ग्रामपंचायत, शिवयोध्दा सोशल फाऊंडेशनच्या सहकार्यांने नुकतेच पुर्ण झाले. काल झालेल्या पहिल्याच पावसाने तुडूंब भरून वाहु लागल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत झाले असून महिलांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले.
येथील बेंद नाल्याच्या खोलीकरणाचे काम प्रथमच मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्याने येथील गाळ शेतक-यांनी स्वखर्चाने ट्रॅक्टरद्वारे वाहून नेला व परिसरातील शेती मोठ्या प्रमाणात तयार केल्यामुळे शेती पिकाखाली आली. सदर पाण्याचा परिसरातील शेतीसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्यामुळे चिचोंडी परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहेत.शिवयोध्दा सोशल फाउंडेशनचे कानिफनाथ मढवई,सरपंच रवींद्र गुंजाळ, महेश पाटील,श्रावण मढवई, सुभाष मढवई, अतुल कोकाटे, समाधान मढवई, नारायण मढवई, सुकदेव मढवई, राजेंद्र मढवई, प्रविण पाटील, नितीन मढवई, दत्तु मढवई, बबन मढवई, श्रीहरी मढवई, सागर मढवई, जयश्री मढवई, कल्पना मढवई, संगीता मढवई, अनुराधा मढवई आदी ग्रामस्थ जलपुजन प्रसंगी उपस्थित होते. युवा मित्रच्या येवला तालुका समन्वयक रूपाली वाघ व कृषी सहाय्यक शिंदे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.