केळझर धरणाचे जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 08:04 PM2018-08-22T20:04:07+5:302018-08-22T20:04:58+5:30

बागलाणच्या पश्चिम पट्ट्यास वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, मंगळवारी केळझर कृती समितीचे दिवंगत अध्यक्ष शिवाजी सोनवणे यांच्या वतीने संजय शिवाजी सोनवणे, सचिव कैलास बोरसे, राकेश मोरे व मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

Jalpujan of Keljhar dam | केळझर धरणाचे जलपूजन

केळझर धरणाचे जलपूजन

Next

बागलाणच्या पश्चिम पट्ट्याबरोबर सटाणा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका असलेले केळझर धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, दरवर्षाप्रमाणे यंदाही केळझर कृती समितीच्या वतीने धरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. धरण पूर्ण भरल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. यावेळी कैलास बोरसे, राकेश मोरे, कडू मोरे, केदा मोरे, महादू सावकार, बाजीराव देवरे, योगेश सोनवणे, विजय मोरे, अशोक सोनवणे, जगन्नाथ बिरारी, अरुण वाघ, योगेश सोनवणे, देवीदास सावकार, लाला मोरे, भिला बागुल आदिंसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Jalpujan of Keljhar dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी