नाशिक: नदींना भिंत हा एक प्रकारचा भ्रष्टाचार; जलपुरुष राजेंद्रसिंह यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:06 PM2021-07-29T13:06:50+5:302021-07-29T13:07:20+5:30
नद्यांशी सदाचाराचा व्यवहार असला पाहिजे, मात्र सरकार पुराच्या भीतीने घाबरून भिंत बांधत असेल तर सदाचार नसून भ्रष्टाचार आहे असे मत जलपुरुष राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
नाशिक: नद्यांशी सदाचाराचा व्यवहार असला पाहिजे, मात्र सरकार पुराच्या भीतीने घाबरून भिंत बांधत असेल तर सदाचार नसून भ्रष्टाचार आहे असे मत जलपुरुष राजेंद्रसिंह यांनी आज नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
राज्यात सहा जिल्ह्यात पूरस्थिती असल्याने नद्यांना भिंत बांधण्याचे जाहीर केले आहे त्यावर टीका करताना राजेंद्रसिंह यांनी नाशिक मध्ये बोलताना टीका केली. मुळात नदीलगत ब्लु- रेड झोन असतो अशा वेळी भिंत बांधणे शक्य नाही मात्र अशा प्रकाराला विरोध करण्यासाठी घोषणा करणाऱ्यांना विधिवत पत्र दिले जाईल, असे ते म्हणाले. हे केवळ ठेकेदारांचे हित जपण्याचा प्रकार आहे अशी टीका राजेंद्रसिंह यांनी केली.
केंद्र सरकारच्या नमामी गंगा या प्रकल्पात नदी कार्पोरेट कम्पन्याचे हित जोपासण्याचा उद्देश असल्याची टीकाही त्यांनी केली.