बाजार समित्यात ठप्प; किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:12 AM2021-05-17T04:12:57+5:302021-05-17T04:12:57+5:30

चौकट- फ्लॉवर २० नग भाजीपाला विक्रेत्यांवर निर्बंध असल्यामुळे किरकोळ बाजारात फ्लॉवर २० रुपये, तर कोबी १० ते १५ रुपये ...

Jam in market committee; Prices of vegetables increased in the retail market | बाजार समित्यात ठप्प; किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले

बाजार समित्यात ठप्प; किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले

Next

चौकट-

फ्लॉवर २० नग

भाजीपाला विक्रेत्यांवर निर्बंध असल्यामुळे किरकोळ बाजारात फ्लॉवर २० रुपये, तर कोबी १० ते १५ रुपये नग याप्रमाणे विकला जात आहे. कोथंबिरीची जुडी ६० रुपयांपर्यंत गेली आहे. गिलगे, दोडके या फळभाज्यांचेही दर वाढले आहेत.

चौकट-

सोयाबीन तेल महागले

डिझेलचे वाढलेले दर, लॉकडाऊनचा परिणाम यामुळे किराणा बाजारात तेजीचे वातावरण असून, सोयाबीन तेलात लिटरमागे दहा रुपयांनी वाढले आहेत. डाळी आणि इतर किराणा मालातही एक दोन रुपयांनी वाढले आहेत.

चौकट-

सफरचंद २४० रु. किलो

फळ बाजारात सफरचंद, संत्रा, मोसंबी या फळांना मागणी चांगली आहे; पण आवक खूपच कमी असल्याने सर्वच फळांचे भाव वाढले असून, सफरचंद २०० ते २४० रुपये, तर संत्रा १४० ते १६० रुपये किलो दराने विकली जात आहे.

कोट -

डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचे दर वाढले आहेत त्यात लॉकडाऊनमुळे माल वेळेवर येत नसल्याने किराणा बाजारात तेजी आली आहे. वेळेचे बंधन असल्यामुळे ग्राहकीवर परिणाम झाला आहे. डाळी, खाद्यतेल यांचे दर थोड्या प्रमाणात वाढले आहेत. - अनिल बुब, किराणा व्यापारी

कोट-

कोरोनामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भाजीपाला वेळीच विकला गेला नाही तर तो फेकून द्यावा लागतो. मोठा खर्च करून पिकविलेला भाजीपाला केवळ बाजार समित्या बंद असल्यामुळे भाजीपाला कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. - अशोक रौंदळ, शेतकरी

कोट-

सकाळी भाजी विक्रेत्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही. त्यातही दर वाढल्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सर्वच वस्तूंचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांनी जगावे कसे ? - शालिनी जाधय, गृहिणी

Web Title: Jam in market committee; Prices of vegetables increased in the retail market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.