येवल्यात जमाते इस्लामी हिंदचे अंधारातून प्रकाशाकडे अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:49 AM2021-02-05T05:49:59+5:302021-02-05T05:49:59+5:30

प्रारंभी, मौलाना इस्माईल नदवी यांनी पवित्र कुराणमधील सुरेह (श्लोक) लोकांना सांगितले व त्याचे मराठी भाषांतर शकील शेख यांनी केले. ...

Jamaat-e-Islami Hind's campaign from darkness to light in Yeola | येवल्यात जमाते इस्लामी हिंदचे अंधारातून प्रकाशाकडे अभियान

येवल्यात जमाते इस्लामी हिंदचे अंधारातून प्रकाशाकडे अभियान

Next

प्रारंभी, मौलाना इस्माईल नदवी यांनी पवित्र कुराणमधील सुरेह (श्लोक) लोकांना सांगितले व त्याचे मराठी भाषांतर शकील शेख यांनी केले. मौलाना फैरोज आजमी यांनी जमाते इस्लामीच्या विविध अभिमान व उपक्रमाबद्दल माहिती दिली. प्रत्येक धर्म हा शांती व सद‌्‌भावना शिकवतो, इस्लाममध्ये राष्ट्रप्रेम व इतर धर्माचा आदर करणे याला खूप महत्त्व आहे, असे आजमी यांनी सांगितले.

यावेळी राहुल लोणारी, सचिन सोनवणे, प्रकाश इंगळे यांनी मनोगतात येवल्यात हिंदू-मुस्लीम सलोखा टिकून असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात मौलाना नासीर पाशू यांनी अंधारातून प्रकाशाकडे अभियान म्हणजे काय याचे विश्लेषण केले. नमाज, अजान का पुकारले जाते, त्याचा मराठी अनुवाद काय आहे, याबाबतची माहिती दिली.

सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अजहर शाह यांनी केले. कार्यक्रमास रवींद्र करमासे, सुनील गायकवाड, मुकुंद आहिरे, वसंत घोडेराव, मुशरीफ शाह, शहराध्यक्ष जमील अन्सारी, शकील शेख, मुशताक अन्सारी, इम्रान शेख, मकसूद महेवी, फैसल अन्सारी, शाफिक अन्सारी आदींसह सर्वच स्तरांतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

===Photopath===

020221\02nsk_20_02022021_13.jpg

===Caption===

येवला येथे अधारातून प्रकाशाकडे अभियानप्रसंगी मार्गदर्शन करताना मौलाना नासिर पाशू.

Web Title: Jamaat-e-Islami Hind's campaign from darkness to light in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.