जमेतुल उलेमाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:16 AM2018-04-22T00:16:05+5:302018-04-22T00:16:05+5:30
जम्मू-काश्मीर येथील कठुआ, उन्नव व सुरत येथील घटनेतील बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, गेल्या साठ वर्षात दीड लाख बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्कारांच्या खटल्यांसाठी जलद गती न्यायालय स्थापन करावे या मागणीसाठी येथील जमेतुल उलमा संघटनेच्या पदाधिकाºयांसह सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते.
मालेगाव : जम्मू-काश्मीर येथील कठुआ, उन्नव व सुरत येथील घटनेतील बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, गेल्या साठ वर्षात दीड लाख बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. बलात्कारांच्या खटल्यांसाठी जलद गती न्यायालय स्थापन करावे या मागणीसाठी येथील जमेतुल उलमा संघटनेच्या पदाधिकाºयांसह सर्वपक्षीय पदाधिकाºयांनी येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी चिमुकल्या मुलींनी प्रांताधिकारी अजय मोरे यांना निषेधाचे व मागणीचे निवेदन सादर केले. कठुआ येथील आठ वर्षाच्या मुलीवर झालेल्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कठुआ घटनेचा निषेध व्यक्त करीत सदर खटला काश्मीर बाहेर चालविण्यात यावा, या घटनेतील संशयितांना मदत करणाºया अधिकाºयांविरुद्ध गुन्हे दाखल करावे, पीडित कुटुंबीयांना संरक्षण द्यावे आदी मागण्यांसाठी शनिवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे कॅम्प रस्त्यावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. या आंदोलनात आमदार आसिफ शेख, माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद ईस्माईल, अस्लम अन्सारी, अतहर अश्रफी, मुस्तकीन डिग्निटी, सुफी गुलाम रसुल, भगवान आढाव, निखिल पवार, देवा पाटील, बुलंद एकबाल आदि सहभागी झाले होते.