जांभूळपाडा येथे गॅसच्या भडक्याने चौघे भाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 01:48 AM2022-01-10T01:48:06+5:302022-01-10T01:48:24+5:30
स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनची तपासणी करताना कारागिराकडून चूक झाल्याने गॅस गळती होऊन अचानक उडालेल्या भडक्याने घरातील चौघांचे पाय भाजल्याची घटना घडली. सुदैवाने तत्काळ उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.
जोगमोडी : स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनची तपासणी करताना कारागिराकडून चूक झाल्याने गॅस गळती होऊन अचानक उडालेल्या भडक्याने घरातील चौघांचे पाय भाजल्याची घटना घडली. सुदैवाने तत्काळ उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.
पेठ तालुक्यातील जांभूळपाडा येथे एका गॅस एजन्सीकडून कनेक्शन तपासणीसाठी आलेल्या कारागिराने तपासणीत केलेल्या हलगर्जीपणामुळे घरात गॅस पसरला. टेस्टिंगसाठी काडी पेटवल्याने आधीच पसरलेल्या गॅसचा भडका झाल्याने सर्वत्र घबराट पसरला. यामध्ये गोवर्धन परशराम भोये (४०), डिंपल खुशाल अलबाड (२८), ओमकार गोपाळ खोटरे (१३), तुषार रमेश अलबाड ( ३१) यांचे गुडघ्यापासून खाली पाय भाजले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे कार्याध्यक्ष गणेश गवळी यांनी नातेवाइकांच्या मदतीने तत्काळ जखमींना पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने अनर्थ टळला. याबाबत पेठ पोलिसांनी रुग्णालयात येऊन जबाब घेतले असून रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.