जनार्दन स्वामी हेच गुरुमाउली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:19 AM2017-09-26T00:19:57+5:302017-09-26T00:20:04+5:30
वैराग्य, शांती, वात्सल्यमूर्ती आणि प्रेमदृष्टी हे प्रमुख गुण सदगुरू जनार्दन स्वामींमध्ये होते. जनार्दन स्वामींनी सर्व भक्तांना सज्ञान करून भक्ती मार्गाला लावले म्हणून जनार्दन स्वामी हेच गुरूमाउली होय, असे प्रतिपादन परमपुज्य माधविगरी महाराज यांनी केले.
्रपंचवटी : वैराग्य, शांती, वात्सल्यमूर्ती आणि प्रेमदृष्टी हे प्रमुख गुण सदगुरू जनार्दन स्वामींमध्ये होते. जनार्दन स्वामींनी सर्व भक्तांना सज्ञान करून भक्ती मार्गाला लावले म्हणून जनार्दन स्वामी हेच गुरूमाउली होय, असे प्रतिपादन परमपुज्य माधविगरी महाराज यांनी केले. जनार्दन स्वामी महाराज यांच्या १०३व्या जयंती महोत्सवनिमित्ताने माधविगरी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्र म झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, बाबाजींच्या अंगी कायम विनम्रता होती, त्यामुळे बाबांनी कधीच आपला प्रभाव दाखविला नाही. सदगुरू जनार्दन स्वामींचा जन्म नवरात्रीच्या पाचव्या माळेला झाला असल्याने श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे तत्त्व जनार्दन स्वामींमध्ये असून, गुरुमाउली ही आपल्या सर्वांची माउली असल्याचे माधविगरी महाराज यांनी शेवटी सांगितले. भाऊ पाटील यांनी बाबाजींच्या जीवन चरित्रावर प्रवचन झाले. या जयंती महोत्सवाला परमपूज्य माधवगिरी महाराज, संतोषगिरी महाराज, अण्णासाहेब चव्हाण, मधु जेजूरकर, परशुरामगिरी महाराज, शिवगिरी महाराज, श्रावणगिरी महाराज, जयरामगिरी महाराज, गणेशगिरी महाराज, राघवगिरी महाराज यांच्यासह सर्व विश्वस्त आणि स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त औरंगाबाद रोडवरील श्री जनार्दन स्वामी आश्रमात गेल्या तीन दिवसांपासून माधवगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जयंती महोत्सवाची सांगता करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या महामृत्युंजय यागाची पूर्णाहुती माधवगिरीजी महाराज आणि संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह साधूसंत व विश्वस्तांच्या हस्ते करण्यात आली. जनार्दन स्वामी लॉन्स येथे मुख्य जन्मसोहळा उत्साहात करण्यात आला.