उस्थळे सरपंचपदी जनार्दन राऊत तर उंबरपाडयाला निवृत्ती वाघमारे झाले सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:05 PM2019-05-14T13:05:11+5:302019-05-14T13:05:44+5:30

पेठ -अडीच वर्षाच्या आवर्तनानुसार रिक्त झालेल्या पेठ तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यात उस्थळे ग्रामपंचायत सरपंचपदी जनार्दन राऊत यांची तर उंबरपाडा(क) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसेचे निवृत्ती वाघमारे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

Janardhan Raut, Usharpada, Sarpanch | उस्थळे सरपंचपदी जनार्दन राऊत तर उंबरपाडयाला निवृत्ती वाघमारे झाले सरपंच

उस्थळे सरपंचपदी जनार्दन राऊत तर उंबरपाडयाला निवृत्ती वाघमारे झाले सरपंच

Next

पेठ -अडीच वर्षाच्या आवर्तनानुसार रिक्त झालेल्या पेठ तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यात उस्थळे ग्रामपंचायत सरपंचपदी जनार्दन राऊत यांची तर उंबरपाडा(क) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनसेचे निवृत्ती वाघमारे यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. बारा पाडयांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उस्थळे ग्रूप ग्रामपंचायतीची सरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एल.एन. जाधव यांच्या उपस्थितीत विशेष सभा घेण्यात आली. पुढील अडीच वर्ष कालावधीसाठी जनार्दन राऊत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. याप्रसंगी तलाठी एस.एस. फोकणे, ग्रामसेवक एन.बी. गावीत, जनार्दन भुसारे, प्रल्हाद पवार, यशवंत पवार, गोवर्धन गावंढे, त्र्यंबक भुसारे, विठ्ठल भुसारे, सोमनाथ भोये यांचे सह सदस्य उपस्थित होते.
उंबरपाडा ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवड प्रक्रि या मंडल अधिकारी प्रकाश गोतरणे यांच्या उपस्थितीत पार पडली.एकूण सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत निवृत्ती वाघमारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली. उंबरपाडा पैकी गावंध पाडा या छोट्याशा वाडीला प्रथमच सरपंचपदाचा मान मिळाला आहे. याप्रसंगी तलाठी प्रकाश पालवे, ग्रामसेवक जी.जी. बागूल, माजी सरपंच रोहीदास गवळी, हिरा राऊत, हर्षला मोरे, मंजूळा गुंबाडे, मंगला ठाकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Janardhan Raut, Usharpada, Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक