जनस्थान फेस्टिव्हलला गुरुवारपासून सुरुवात

By admin | Published: June 19, 2017 01:50 AM2017-06-19T01:50:54+5:302017-06-19T01:52:00+5:30

जनस्थान फेस्टिव्हलला गुरुवारपासून सुरुवात

Janasthan Festival starts from Thursday | जनस्थान फेस्टिव्हलला गुरुवारपासून सुरुवात

जनस्थान फेस्टिव्हलला गुरुवारपासून सुरुवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘जनस्थान’ या व्हॉट््सअ‍ॅप ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार (दि. २२)पासून तीन दिवसीय ‘जनस्थान फेस्टिव्हल’चे परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार प्रदान सोहळा, चित्रशिल्प प्रदर्शन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या फेस्टिव्हल अंतर्गत ग्रुपचे सदस्य दिवंगत तबला वादक प्रमोद भडकमकर यांना मरणोत्तर ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, प्रा. डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच राष्ट्रीय पातळीवर नाशिकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संगीत आणि अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटविलेल्या पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे आणि विद्या करंजीकर यांना यावर्षीचा ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी ‘समर्पण’ या कार्यक्रमातून प्रमोद भडकमकर यांना सांगितिक कार्यक्रमातून मानवंदना देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या दिवशी ‘सन्मान’ या कार्यक्रमादरम्यान ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्काराचे ख्यातनाम सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी ‘सृजन’हा नृत्याविष्कार सादर होणार असून, यात विद्या देशपांडे, सुमुखी अथणी आणि कीर्ती भवाळकर या कथक नृत्य सादर करणार आहेत. त्यांना मोहन उपासनी, आशिष रानडे, नितीन पवार साथसंगत करणार
आहेत.
या महोत्सवात समावेश असणार आहे. पहिल्या दिवशी होणाऱ्या समर्पण या कार्यक्रमात नितीन पवार, नितीन वारे, सतीश पेंडसे, सुजीत काळे, दिगंबर सोनवणे आणि वैष्णवी भडकमकर हे तबलावादन करणार आहे आणि प्रमोद भडकमकर यांनी ज्यांना साथसंगत केली ते सुभाष दसककर, अविराज तायडे, मकरंद हिंगणे, अनिल दैठणकर, विद्या देशपांडे, कीर्ती भवाळकर, मोहन उपासनी हे कलावंत सहभागी होणार आहेत, तर दुसऱ्या दिवसाची सुरुवात पारंपरिक नांदीने होणार आहेत आणि यात आशिष रानडे, ज्ञानेश्वर कासार, आनंद अत्रे, रागिणी कामतीकर, विद्या कुलकर्णी, गीता माळी, प्राजंली बिरारी, नवीन तांबट, सतीश पेंडसे, दिगंबर सोनवणे आदी कलावंत सहभागी होणार असून, या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.‘संभव’ चित्रशिल्प प्रदर्शनाचे आकर्षणजनस्थान फेस्टिव्हल दरम्यान तीनही दिवशी ‘संभव’ या चित्रशिल्पाचा आनंद नागरिकांना घेता येणार असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, नंदू गवांदे, सी. एल. कुलकर्णी, अनिल माळी, प्रसाद पवार, केशव कासार, संदीप लोंढे, यतिन पंडित, श्याम लोंढे, स्नेहल एकबोटे, शीतल सोनवणे, श्रेयस गर्गे या कलावंतांचे चित्रशिल्प मांडण्यात येणार आहे.

Web Title: Janasthan Festival starts from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.