जनता दल अस्तित्वहीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 11:06 PM2019-10-05T23:06:24+5:302019-10-05T23:08:19+5:30
नाशिक : सलग पस्तीस वर्षांहून अधिक काळ मालेगाव मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवून, एकेकाळी राज्याच्या विधिमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद व देशातून एकमेव खासदार संसदेत पाठवून गट नेतेपद खेचून आणणाऱ्या जनता दलाचे यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यातून अस्तित्व नष्ट झाले आहे. बदललेली राजकीय समीकरणे व पक्षाची धुरा सक्षमपणे हाताळणाºया नेतृत्वाअभावी या पक्षावर मालेगाव मतदारसंघात यंदा एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

राष्टÑीय जनता दलाच्या निर्मितीपूर्वीपासूनच मालेगाव मतदार संघाने पुरोगामी विचारांना साथ दिली. संयुक्त महाराष्टÑाच्या निर्मितीनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत स्व. निहाल अहमद यांनी पहिल्यांदाच मालेगाव मतदारसंघावर जनता दलाचा झेंडा फडकविला. त्यानंतर सलग सात वेळा त्यांनी हा बालेकिल्ला अधिक भक्कम केला. एवढेच नव्हे तर तत्कालीन दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जनता दलातून थेट संसदेत खासदार पाठविण्यातही मालेगावने वेळोवेळी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्यात नाशिक जिल्ह्यात व त्यातल्या त्यात मालेगाव मतदारसंघात जनता दलाने आपला गड शाबूत ठेवल्यामुळे जॉर्ज फर्नांडिस, एच. डी. देवगौडा, शरद यादव यांसारख्या राष्टÑीयस्तरावरील नेत्यांनी देखील वेळोवेळी पाठराखण केली. स्व. निहाल अहमद यांचा विधिमंडळातील कामकाजाचा अनुभव लक्षात घेता विरोधी पक्षांच्या वतीने त्यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सोपविली होती. १९९८ मध्ये केंद्रातील अल्पमतातील अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पराभूत झाल्यानंतर देशपातळीवरील राजकीय घडामोडीत राष्टÑीय जनता दलाची शकले उडाली व त्यातून जनता दल सेक्युलर या नवीन पक्षाची स्थापना झाली. नाशिक जिल्ह्याने जनता दल सेक्युलरच्या बाजूने कौल दिला. याच काळात जनता दलाचे राज्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्व. निहाल यांना प्रदेशाध्यक्षाच्या रूपाने मिळाली. २००४ मध्ये मालेगाव मतदार संघाने परिवर्तन घडविले व जनता दलाची मक्तेदारी संपुष्टात आणली. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्व. निहाल अहमद यांच्यानंतर त्यांच्या पुत्राने मालेगाव मतदारसंघातून उमेदवारी दाखल करून मतदारांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु मतदारांनी त्याला नाकारले मात्र जनता दलाला दुसºया क्रमांकाची मते मिळाली. यंदा मात्र विधानसभा निवडणुकीत स्व. निहाल यांचा वारसा चालविण्यास कोणीही पुढे न आल्याने जनता दलाला एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.