करकोंडी सोडविण्यासाठी उद्या जनता दरबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:02 AM2018-04-20T01:02:18+5:302018-04-20T01:02:18+5:30
नाशिक : मनपाने केलेल्या कर आणि दरवाढीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा भडका रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविली असल्याने येत्या शनिवारीच ते नाशिकमध्ये दाखल होऊन विविध समाजघटकांच्या भावना समजून घेणार आहेत. त्याच दिवशी किंवा सोमवारी (दि. २३) महासभा होण्याच्या आतच यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे.
नाशिक : मनपाने केलेल्या कर आणि दरवाढीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाचा भडका रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपविली असल्याने येत्या शनिवारीच ते नाशिकमध्ये दाखल होऊन विविध समाजघटकांच्या भावना समजून घेणार आहेत. त्याच दिवशी किंवा सोमवारी (दि. २३) महासभा होण्याच्या आतच यावर तोडगा काढण्याची शक्यता आहे.
गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री गिरीश महाजन हे शेतकरी आणि अन्य घटकांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती आमदार सीमा हिरे यांनी दिली.
महापालिकेच्या वतीने यंदा घरपट्टीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर लगोलग आयुक्तांनी त्यांच्या विशेषाधिकारात जमिनीचे करयोग्य मूल्य निश्चित केले. त्यात मोकळ्या भूखंडावर कर लागू करण्यात आला आहे. शेतीला कर लागू होणार असल्याने त्यावर मोठ्या प्रमाणात ओरड झाली होती. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे त्यात खुलासा करून हरित क्षेत्रात कर लागू नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तथापि, गेल्याच वर्षी शहर विकास आराखडा मंजूर झाला त्यात ८० टक्के रहिवासी क्षेत्र असून, त्यात शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत, त्यावर मात्र कर लागूच राहणार आहे. त्यामुळे गावठाण भागात शेतकऱ्यांचे मेळावे सुरूच असून, त्यांच्या धास्तीने भाजपाने तातडीने २३ तारखेला करवाढीच्या विरोधात विशेष महासभा बोलावली आहे. तत्पूर्वी भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी तातडीने पालकमंत्री गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये येऊन शेतकरी उद्योजक आणि अन्य घटकांशी चर्चा करण्यास सांगितले आहे. व महाजन हेच प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढतील असे कळविले असल्याने ते शनिवारी नाशिक दौºयावर येऊन शेतकरी आणि अन्य घटकांशी चर्चा करणार आहेत.
वॉक विथ कमिश्नरकडे लक्ष
४महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवारी (दि. २१) वॉक विथ कमिश्नर उपक्रम राबविणार असून त्यातही अनेकांनी करवाढीसंदर्भात प्रश्न विचारण्याची तयारी केली आहे. गावठाण भागात बैठका सुरूचकरवाढ विरोधातील शेतकºयांच्या बैठका सुरूच असून, या सर्व ठिकाणी शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. २३ तारखेला करवाढीच्या विरोधात विशेष महासभा असल्याने त्या दिवशी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याशिवाय मोर्चा, रास्ता रोको आणि नाशिक बंद अशाप्रकारचे आंदोलन करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती राष्टÑवादी कॉँग्रेसचे गटनेता गजानन शेलार यांनी सांगितले.