साडेपाच लाखांहून अधिक लाभार्थींना ‘जनधन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 12:31 AM2020-05-17T00:31:19+5:302020-05-17T00:31:40+5:30
नाशिक : लॉकडाउननंतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, गोरगरीब, उपेक्षित आदींवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी केंद्र शासनाकडून मोफत तांदूळ वाटप योजनेबरोबरच घरातील गृहिणींच्या बँक खात्यातही प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून दरमहा पाचशे रुपये जमा करण्यात येत आहेत.
नाशिक : लॉकडाउननंतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, गोरगरीब, उपेक्षित आदींवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी केंद्र शासनाकडून मोफत तांदूळ वाटप योजनेबरोबरच घरातील गृहिणींच्या बँक खात्यातही प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून दरमहा पाचशे रुपये जमा करण्यात येत आहेत. पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत ठेवींअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख ६८ हजार महिलांनी त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम काढून घेत आपापल्या कुटुंबांना आधार दिला.
गोरगरीब महिला आणि कुटुंबीयांना या मदतीमुळे महिन्याच्या गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी काहीसा आधार मिळाल्याची नागरिकांची भावना आहे. मे महिन्यापासूनच संबंधित खातेधारकांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येत आहे. दरमहिन्याला ५०० रुपये याप्रमाणे ही रक्कम जमा होत असून, संबंधित महिलादेखील त्या रकमेचा उपयोग कुटुंबाच्या गरजेच्या वस्तू खरेदीसाठी करीत आहेत. त्यामुळे रेशनवर मिळणाऱ्या धान्याव्यतिरिक्त भाजी, मीठ, तेल यासाठीची खरेदी करून दैनंदिन जगण्यासाठी आवश्यक त्या अन्नाची उपलब्धता करून देणे महिलांनादेखील शक्य होत आहे. जिल्ह्यात अत्यंत सुरळीतपणे हे वितरण सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ या साथरोगामुळे एकाच वेळी बँक व ग्राहक सेवा केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी वित्त मंत्रालाच्या वित्तीय सेवा विभागामार्फत वेळापत्रक आखण्यात आले होते. त्या वेळापत्रकानुसार संबंधित महिलांनी येऊन या रकमा काढून घेतल्या आहेत. वित्तीय विभागाने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार या सर्व महिलांनी रक्कम काढून घेतली. त्यानंतर नियमितपणे संबंधित बॅँक, पोस्टआॅफिस, पोस्टमन, एटीएम, ग्राहक सेवा केंद्रांमधून ही रक्कम महिलांना उपलब्ध होत आहे.