जनलक्ष्मीच्या संचित तोट्यात घट; वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 03:36 PM2018-09-08T15:36:36+5:302018-09-08T15:40:17+5:30

बँकेचा २०१६-१७ अखेर एकूण संचित तोटा १९ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये होता. परंतु अहवाल वर्षात बँकेला आठ कोटी १६ लाख ९५ हजार रुपयांचा नफा झाला असून, हा नफा संचित तोट्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मार्च २०१८ अखेर संचित तोट्यात घट होऊन तो ११ कोटी ३० लाख ८९ हजार रुपयांपर्यंत आला असून, बँके च्या संचित तोट्यात घट झाल्याची माहिती संचालक मंडळाने सर्वसाधारण बैठकीत दिली. तसेच बँकेकडे ३१ मार्चखेर १४३ कोटी ७९ लाख ९३ हजार रुयपयांच्या ठेवी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

Janlakshmi reduces the accumulated losses; Annual General Meeting | जनलक्ष्मीच्या संचित तोट्यात घट; वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

जनलक्ष्मीच्या संचित तोट्यात घट; वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Next
ठळक मुद्देजनलक्ष्मी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा संचित तोट्यात ११ कोटी ३० लाख ८९ हजार रुपयांपर्यंत घट

नाशिक: जनलक्ष्मी बँकेचा २०१६-१७ अखेर एकूण संचित तोटा १९ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये होता. परंतु अहवाल वर्षात बँकेला आठ कोटी १६ लाख ९५ हजार रुपयांचा नफा झाला असून, हा नफा संचित तोट्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मार्च २०१८ अखेर संचित तोट्यात घट होऊन तो ११ कोटी ३० लाख ८९ हजार रुपयांपर्यंत आला असून, बँके च्या संचित तोट्यात घट झाल्याची माहिती संचालक मंडळाने सर्वसाधारण बैठकीत दिली. तसेच बँकेकडे ३१ मार्चखेर १४३ कोटी ७९ लाख ९३ हजार रुयपयांच्या ठेवी असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. 
जनलक्ष्मी सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा परशुराम साइखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.८) बँकेचे अध्यक्ष माजी खासदार माधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेत खेळीमेळीत पार पडली. व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांच्यासह संचालक रामरतन कारवा, स्वप्ना निंबाळकर, उत्तमराव उगले, श्रीकांत रहाळकर, रवींद्र अमृतकर, भालचंद्र पाटील, शरद गांगुर्डे, सतीश सोनवणे आदी उपस्थित होते. बँक कठीण परिस्थितीत असताना सभासद, ठेवीदार व हितचिंतकांनी बँकेवर विश्वास कायम ठेवल्याचे सांगत संचालक मंडळ व व्यवस्थापनाने एकत्र येत कर्जवसुली मोहीम प्रभावीपणे राबवून आपले अस्तित्व टिकवून ठेवल्याचे सांगितले, तर संचालक मंडळासह व्यवस्थापन व कर्मचाºयांच्या परिश्रमामुळे बँकेने विविध अडचणींवर मात करतानाच रिझर्व्ह बँकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांचे काटेकोर पालन केल्याने बँकेला कर्जवाटपासारख्या मुख्य व्यवसायाकडे वळता आल्याचे उपाध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी सांगितले. प्रास्ताविक जयंत जानी यांनी केले. सूत्रसंचालन संदीप नाटकर यांनी केले. संजय चव्हाण यांनी आभार मानले. 

Web Title: Janlakshmi reduces the accumulated losses; Annual General Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.