जानोरी धान्य घोटाळा पूर्ववैमनस्यातून उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:37 PM2017-11-24T23:37:29+5:302017-11-25T00:31:53+5:30

दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे पकडण्यात आलेला धान्याचा साठा हा रेशनचा काळाबाजार करणाºया टोळ्यांमधील पूर्ववैमनस्यातून उघडकीस आला असून, त्यात एका टोळीने पोलिसांना धान्याची सुपारी दिली, तर दुसºया टोळीने ग्रामीण पोलिसांच्या मदतीने स्वत:चा बचाव करण्यासाठी अटक करवून घेतल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. संपत घोरपडे याने पवन चौधरी याला संपविण्यासाठी पोलिसांची मदत घेतल्याचेही आता बोलले जात असून, यात पोलिसांचा एक गट चौधरी यालाही मदत करीत आहे.

Janori Gana scam pre-emptive disclosure | जानोरी धान्य घोटाळा पूर्ववैमनस्यातून उघडकीस

जानोरी धान्य घोटाळा पूर्ववैमनस्यातून उघडकीस

googlenewsNext
ठळक मुद्देएका टोळीने पोलिसांना धान्याची सुपारी दिली,वाडीवºहे येथील रेशन धान्य काळाबाजाराचे कारण दोघांची जामिनावर मुक्तता

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथे पकडण्यात आलेला धान्याचा साठा हा रेशनचा काळाबाजार करणाºया टोळ्यांमधील पूर्ववैमनस्यातून उघडकीस आला असून, त्यात एका टोळीने पोलिसांना धान्याची सुपारी दिली, तर दुसºया टोळीने ग्रामीण पोलिसांच्या मदतीने स्वत:चा बचाव करण्यासाठी अटक करवून घेतल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. संपत घोरपडे याने पवन चौधरी याला संपविण्यासाठी पोलिसांची मदत घेतल्याचेही आता बोलले जात असून, यात पोलिसांचा एक गट चौधरी यालाही मदत करीत आहे.  या घटनेमागे चालू वर्षी मार्च महिन्यात घडलेल्या वाडीवºहे येथील रेशन धान्य काळाबाजाराचे कारण दडलेले असून, ग्रामीण पोलिसांनी वाडीवºहे येथील गुन्ह्णातील आरोपींना मोक्कान्वये कारावाई केली होती व त्यात संपत चौधरीसोबत त्याचे दोघे भाऊही सहा ते सात महिने तुरुंगात होते, त्यातील संपत वगळता अन्य दोघांची जामिनावर मुक्तता करण्यात आली असून, या साºया प्रकरणामागे पवन चौधरी हाच होता, असे घोरपडे यांना पुरावे मिळाले आहेत. पवन चौधरी हा त्या गुन्ह्णात मुख्य साक्षीदार आहे, तसेच ग्रामीण पोलीस दलातील एका निवृत्त पोलीस उपअधीक्षकाच्या मदतीने घोरपडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्यामुळे पवन चौधरी याचादेखील त्याचपद्धतीने काटा काढायचा विडा घोरपडे कुटुंबीयांनी उचलून चौधरी याच्या जानोरी येथील खासगी गुदामावर पोलिसांकरवी छापा घडवून आणला आहे. ज्या दिवशी चौधरी याच्या गुदामावर छापा मारण्यात आला त्याचदिवशी रात्री ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाºयासोबत घोरपडे हा त्याठिकाणी गेला होता व त्यांनी गुदामाला बाहेरून कुलूप लावून घेतले होते. त्यानंतर पवन चौधरीने दिंडोरी पोलिसांना गुदामात चोरी झाल्याची खबर देऊन पोलिसांना बोलावून घेतले होते. रात्री दिंडोरी पोलिसांनी या प्रकरणावर कसाबसा पडदा टाकला असतानाच, पहाटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौधरी याच्या गुदामावर छापा मारल्याचे स्पष्ट झाले आहे. गुन्हे शाखेने हा छापा मारत असताना दिंडोरी पोलिसांना अंधारात ठेवले, मात्र घोरपडे याच्याकडून आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगत पवन चौधरी हा स्वत:हून पोलिसांकडे अटक करण्यासाठी गेला होता, असेही आता बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेला पवन चौधरी याच्या गुदामाची खबर घोरपडे याने दिली, हे जसे लपून राहिलेले नाही, तसेच पवन चौधरी याला पोलिसांनीच अभय दिले आहे. 
रेशन दुकानदार हवालदिल 
रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणारे घोरपडे व चौधरी यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्या गुदामांवर अनेकवार छापेही पडले आहेत. काही विशिष्ट रेशन दुकानदारांना हाताशी धरून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा गोरख धंदा सुरू आहे. परंतु आता त्यांच्यातील वैमनस्य एकमेकांना संपविण्यापर्यंत पोहोचल्याने त्यांच्याशी संबंधित रेशन दुकानदार हवालदिल झाले आहेत. अशा दुकानदारांवर पुरवठा खातेही पाळत ठेवून आहे.

Web Title: Janori Gana scam pre-emptive disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.