जनशताब्दी एक्सप्रेसच्या बोगीत बिघाड, सुदैवाने अनर्थ टळला; मनमाडमध्ये दुरुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 03:19 PM2022-12-29T15:19:12+5:302022-12-29T15:19:36+5:30

रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तातडीने या गाडीतील नादुरूस्त झालेली बोगी हटिवण्यात आली.

Janshatabdi Express bogie malfunction, repairs done at Manmad station | जनशताब्दी एक्सप्रेसच्या बोगीत बिघाड, सुदैवाने अनर्थ टळला; मनमाडमध्ये दुरुस्ती

जनशताब्दी एक्सप्रेसच्या बोगीत बिघाड, सुदैवाने अनर्थ टळला; मनमाडमध्ये दुरुस्ती

googlenewsNext

अशोक बिदरी

मनमाड (नाशिक) : जालन्याकडून मुबंईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या बोगीता बिघाड असल्याचं निदर्शनास आलं. मनमाड रेल्वे स्थानकात येताच गाडीच्या एका बोगीच्या चाकाच्या मधोमध घर्षणाने चाकातील पट्टीला तडा (हॉट अॅक्शन ) गेल्याची घटना घडली. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने गाडी थांबविण्यात आली. त्यामुळे, पुढील अनर्थ टळला. 

रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तातडीने या गाडीतील नादुरूस्त झालेली बोगी हटिवण्यात आली. सुमारे दोन तासापेक्षा जास्त काळ मनमाड रेल्वे स्थानकात गाडी थांबली, त्यानंतर गाडी रवाना झाली. गाडी धावत असतांना हा प्रकार घडला असता तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने रेल्वे स्थानकात हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ ठळला.

Web Title: Janshatabdi Express bogie malfunction, repairs done at Manmad station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.