जनुभाऊ आहेर यांचा शंभरावा अभीष्टचिंन सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 05:55 PM2020-10-29T17:55:35+5:302020-10-29T18:11:31+5:30
लोहोणेर : माजी आमदार जनुभाऊ आहेर यांचा शंभरावा अभीष्टचिंन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रामचंद्र पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार शांताराम आहेर, राघोनाना आहिरे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार शेवाळे, संचालक व्ही. एम. निकम, राष्ट्रवादीचे पंडित निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर, नामदेव सूर्यवंशी, गंगाधर शिरसाठ, अरुण खैरनार, विजय आहेर आदी मान्यवर होते.

तत्कालीन चांदवड-देवळा मतदारसंघाचे प्रथम आमदार असलेले जनुभाऊ आहेर हे वयाची ९९ वर्ष पूर्ण करून १००व्या वर्षात पदार्पण करीत असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या वतीने सद्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात माजी आमदार जनूभाऊ आहेर यांच्या शिक्षक ते आमदार या सामाजिक व राजकीय प्रवासातील त्यांच्या कार्याचा तसेच तत्कालीन पाणीप्रश्न सोडवण्यासाठी दिलेल्या योगदानाचा मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आठवणींना उजाळा दिला. यावेळी निंबाजी आहेर, आर. के. पवार, ए.पी. पगार, मधु मेतकर, पी.एल. पाटील, भास्कर आहेर, अरुणा आहेर आदी यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सुशांत खैरनार यांनी, तर प्रास्ताविक अरुण खैरनार यांनी केले. विजय आहेर यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी प्राध्यापिका अरुणा आहेर लिखित कर्मयोगी योद्धा जनुभाऊ आहेर या चरित्रग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कारमूर्ती जनुभाऊ आहेर यांना यावेळी गौरविण्यात आले.