नाट्य वितरक संघटना अध्यक्षपदी जातेगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 01:00 AM2020-07-20T01:00:24+5:302020-07-20T01:00:46+5:30
मुंबई-महाराष्ट्र, कोकण, गोवा, बेळगाव या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र नाट्य व सांकृतिक कार्यक्र म वितरक व्यवस्थापक संघाची स्थापना आणि कार्य समितीची रविवारी (दि.१९) निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नाशिकच्या जयप्रकाश जातेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
नाशिक : मुंबई-महाराष्ट्र, कोकण, गोवा, बेळगाव या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र नाट्य व सांकृतिक कार्यक्र म वितरक व्यवस्थापक संघाची स्थापना आणि कार्य समितीची रविवारी (दि.१९) निवड करण्यात आली. अध्यक्षपदी नाशिकच्या जयप्रकाश जातेगावकर यांची निवड करण्यात आली आहे.
कार्याध्यक्षपदी गिरीश महाजन कोल्हापूर, उपाध्यक्षपदी मोहन कुलकर्णी पुणे, समीर पंडित नागपूर, प्रमुख कार्यवाहपदी आनंद कुलकर्णी कोल्हापूर, सहकार्यवाह प्रवीण बर्वे पुणे, संदीप सोनार औरंगाबाद आणि खजिनदार समीर हंपी पुणे यांची एकमताने निवड करण्यात आली. पूर्णवेळ नाटक वितरण आणि व्यवस्थापनाशी संबंधित असलेले ५४ सदस्य या संघाशी संलग्न आहेत. कालपर्यंत असंघटित असलेले संपूर्ण महाराष्ट्रातील वितरक आणि व्यवस्थापक यानिमित्ताने एकाच व्यासपीठावर आले आहेत.