जऊळके-मुखेड फाटा रस्ताची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 06:48 PM2020-10-27T18:48:07+5:302020-10-27T18:49:01+5:30
पिंपळगाव लेप : जऊळके- मुखेड फाटा रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्यांची मोठी गैरसोय होते आहे.
पिंपळगाव लेप : जऊळके- मुखेड फाटा रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्यांची मोठी गैरसोय होते आहे.
येवला तालुक्यातील पश्चिमभागातील रस्ते अक्षरशः शेवटची घटका मोजत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासुन जऊळके- मुखेड फाटा या रस्ताचे काम रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग याकामाकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सातत्याने पडणार्या पावसाने रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांची येण्या- जाण्याची मोठी परवड होत आहे.
तालुक्याच्या गावाला जाण्यासाठी नाशिक-औरंगाबाद महामार्गावर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. या भागातील असे बरेच रस्ते आहेत, की पायी प्रवास करणे सुद्धा अवघड बनले आहे. पाटोदा, पिंपळगाव लेप, जळगाव नेऊर, जऊळके-जळगाव नेऊर, पाटोदा-सातारे आदीसह परिसरातील अनेक रस्ते दुरावस्थेमुळे, रस्ताच्या मध्यभागीच मोठ-मोठे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून साईट पट्याचा आश्रय घ्यावा लागतो. तसेच कंबर व मणका दुखी अशा व्याधींना सामोरे जावे लागत आहे. सदर रस्तांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केल्या जात असून जऊळके ग्रामस्थांनी तर उपोषणाचा इशारा दिला आहे.
परिसरातील नागरिकांना दळणवळण व शेतीमाल नेण्यासाठी चांगल्या रस्त्याची गरज असते. मात्र, जऊळके- मुखेड फाटा रस्त्यात मोठ- मोठे खड्डे झाले असल्याने वाहनचालकांचे मोठे नुकसान होत आहे. तर पादचार्यांची मोठी गैरसाय होत आहे. सदर रस्ता काम तातडीने हाती घेण्यात यावी, अन्यथा रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन केले जाईल.
- मच्छिंद्र जाधव, युवा तालुकाध्यक्ष, स्वभिमानी शेतकरी संघटना, जऊळके