आघाडी सरकारमुळेच जायकवाडीची जबाबदारी नाशिकवर : देवयानी फरांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 10:45 PM2018-11-17T22:45:36+5:302018-11-18T00:20:22+5:30

जायकवाडी धरण बांधले गेले तेव्हापासून आजपर्यंत फक्त पाच वेळा हे धरण भरले आहे. या धरणाची क्षमता ८१ टी.एम.सी. असली तरी धरणाची वार्षिक सरासरी ४१ टी.एम.सी. इतकी आहे. २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत केल्यामुळे ४० टी.एम.सी. पाण्याची तूट भरून काढण्याची जबाबदारी नाशिकवर आली असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.

Jawakwadi's responsibility for the coalition government depends on Nashik: Devyani Phorande | आघाडी सरकारमुळेच जायकवाडीची जबाबदारी नाशिकवर : देवयानी फरांदे

आघाडी सरकारमुळेच जायकवाडीची जबाबदारी नाशिकवर : देवयानी फरांदे

Next
ठळक मुद्देकायद्याचा गैरवापर : आडगाव ग्रामस्थांतर्फे जाहीर सत्कार समारंभात आरोप

आडगाव : जायकवाडी धरण बांधले गेले तेव्हापासून आजपर्यंत फक्त पाच वेळा हे धरण भरले आहे. या धरणाची क्षमता ८१ टी.एम.सी. असली तरी धरणाची वार्षिक सरासरी ४१ टी.एम.सी. इतकी आहे. २००५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने गोदावरी पाटबंधारे महामंडळाची स्थापना करून समन्यायी पाणी वाटपाचा कायदा संमत केल्यामुळे ४० टी.एम.सी. पाण्याची तूट भरून काढण्याची जबाबदारी नाशिकवर आली असल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे.
गंगापूर व पालखेड धरणांतील पाणी जायकवाडीला जाण्यापासून वाचविल्याबद्दल आडगाव ग्रामस्थांच्या वतीने आमदार देवयानी फरांदे यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर नगरसेवक उद्धव निमसे, नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेविका शीतल माळोदे, माजी नगरसेवक मधुकर मते, पोलीस पाटील एकनाथ मते, संजय तुंगार उपस्थित होते. आ. फरांदे म्हणाल्या, फक्त पिण्याच्या पाण्याची तरतूद असती तर यदा कदाचित आपल्याला मोठा तोटा झाला नसता पण समन्यायी पाणी वाटपामुळे आपल्याकडील १० तालुके दुष्काळी असूनदेखील आपल्या हक्काचे पाणी सोडावे लागत आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे सरकारचे हात बांधलेले पण त्यावर मार्ग म्हणून मी गोदावरी पाटबंधारे महामंडळाला मुकणे धरणातून पाणी सोडण्याचे सांगितले तरीही त्यांनी काहीही म्हणणे ऐकून न घेता, धरणातून काही पाणी सोडले पण कोर्टाच्या निकालातील तरतुदीचा आधार घेत आपली बाजू ऐकायला भाग पाडून त्यांना मुकणे धरणात पिण्याचे आरक्षित असलेले पाणी सोडण्याची विनंती केल्यामुळे गंगापूर धरणाचे दरवाजे बंद झाले आणि शेतीसाठी पाणी वाचवू शकले. असे असले तरी ही लढाई एवढ्यात संपणार नसल्याचे सांगत सर्वांनी पाण्यासाठी राजकीय भेद विसरून एक होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरसेवक उद्धव निमसे, माजी नगरसेवक मधुकर मते, पोलीस पाटील एकनाथ मते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पाणीवाटप संस्था स्थापन करा
आमदार फरांदे यांनी शेतकऱ्यांना, ‘पाणी आपल्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे’ या युक्तीप्रमाणे गावागावात पाणीवाटप संस्था स्थापन करून आपल्याला आवश्यक पाण्याची मागणी नोंदवा त्यावेळी तुमच्या मागणीचा विचार केला जाईल, नाही तर आपल्याकडील शेतकºयांना पश्चात्ताप करावा लागेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Web Title: Jawakwadi's responsibility for the coalition government depends on Nashik: Devyani Phorande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.