जवान दीपक वावधाने केंद्रीय राखीव पोलीस दलातून निवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 07:00 PM2021-02-07T19:00:02+5:302021-02-07T19:03:52+5:30
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दीपक रंगनाथ वावधाने हे केंद्रीय राखीव पोलीस दलात (सी.आर.पी.एफ) मध्ये २० वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले आहे. ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

लहानपणापासून देशसेवा करण्याची गोडी निर्माण झालेल्या दीपक वावधाने यांनी हालाकीच्या परिस्थितीतुन शिक्षण पूर्ण केले. सण २००० मध्ये दीपक वावधाने केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले. त्यांना आर.टी. सी. तीन मध्ये पल्लीपुरम येथे भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. ते झाल्यानंतर पहिली पोस्टिंग २९ बी.एन. सी. आर. पी. एफ च्या बारामुल्ला येथे देण्यात आली होती. नंतर २००७ मध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्ड डेपोटेशन मध्ये ५ वर्षे सेवा बजावली. २०१४ मध्ये बीजापूर घाटी येथील छत्तीसगड येथे बदली झाली. छत्तीसगढ येथून प्रमोशन होऊन २०१७ मध्ये श्रीनगर येथील बडगाव येथे बदली झाली. २०२१ मध्ये जानेवारी अखेर सेवानिवृत्त झाले आहे.