नांदगावच्या कळमदरी गावच्या सरपंच जयाबाई दळवी यांच्याकडून ‘पर्यावरण संवर्धन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 07:08 PM2019-02-28T19:08:09+5:302019-02-28T19:08:26+5:30

लोकसहभागातून वनराई बंधारा बांधून नाला बांधमधीळ गाळाचा उपसा केला. वृक्ष व वन औषधी उद्यान विकसीत केले. तालुक्यातील हे एकमेव पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आले.

Jayabai Dalvi, the Sarpanch of Kalamdari village of Nandgaon, called 'Environment Conservation' | नांदगावच्या कळमदरी गावच्या सरपंच जयाबाई दळवी यांच्याकडून ‘पर्यावरण संवर्धन’

नांदगावच्या कळमदरी गावच्या सरपंच जयाबाई दळवी यांच्याकडून ‘पर्यावरण संवर्धन’

Next

नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावपातळीवर स्मार्ट विकासकामे करणाऱ्या १३ सरपंचांना ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ने समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ‘जो गावची शान, त्याचाच हा बहुमान’ असे ब्रीद घेऊन मागील वर्षांपासून लोकमतने ‘सरपंच अवॉर्ड’चा अभिनव उपक्र म राज्यभर सुरू केला. या उपक्रमांतर्गत नांदगाव तालुक्यातील कळमदरी गावात सरपंच जयाबाई रामजी दळवी यांनी पर्यावरण संवर्धनावर भर देत दिला. त्याबद्दल त्यांना ‘आरोग्य ’ या गटात पुरस्काराने गौरविण्यात आले.
लोकसहभागातून वनराई बंधारा बांधून नाला बांधमधीळ गाळाचा उपसा केला. वृक्ष व वन औषधी उद्यान विकसीत केले. तालुक्यातील हे एकमेव पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आले. ग्रामिण पर्ययन केंद्राच्या परिसरात उत्त्कृष्ट जलाशय बांधले. वत्सला ग्रामीण पर्यटन केंद्राला लागून हिरवाईने नटलेला जॉगिंग ट्रॅक साकारला. परिसरातील जंगलाचे संवर्धन व संरक्षण व्हावे, यासाठी कुºहाड बंदी व चराई बंदीचा ठराव करत अंमलबजावणी केली. यामुळे त्यांना ‘लोकमत’च्या वतीने जल व्यवस्थापन गटात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Jayabai Dalvi, the Sarpanch of Kalamdari village of Nandgaon, called 'Environment Conservation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.