जायखेडा ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडी रवाना

By admin | Published: January 17, 2017 11:05 PM2017-01-17T23:05:16+5:302017-01-17T23:05:34+5:30

परंपरा : वारकऱ्यांची वाढती संख्या

From Jayakheda to Shrikhetra Trimbakeshwar Dandi leaves | जायखेडा ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडी रवाना

जायखेडा ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर दिंडी रवाना

Next

जायखेडा : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यात्रेनिमित्ताने दर्शनासाठी जायखेडा ते श्रीेक्षेत्र त्र्यंबकेश्वर अशी पायी दिंडी नुकतीच रवाना झाली. हजारो वारकरी भाविकांचा जत्था ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, निवृत्तिनाथ महाराज की जय, गुरुवर्य कृष्णाजी माउली की जय’ असा जयघोष व टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी त्र्यंबककडे मार्गस्थ झाली.
या पदयात्रेचे नेतृत्व माउलींच्या कन्या यशोदाअक्का जायखेडकर या करीत आहेत. माउली प्रत्यक्ष नसल्या तरी त्यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन भाविक कृतार्थ भाव व्यक्त करीत आहेत. ही पदयात्रा जायखेडा, निताने, पिंगळवाडे, केरसाने, कपालेश्वर, निकवेल, कंधाने, कळवण-विसापूर, बेज, ओतूर, नेरूळ, मुळाने, तळेगाव, आम्बेवणी,ङ्क्तदिंडोरी, लखमापूर व पुढे वलखेडमार्गे तळेगाव, पिंपळनारे, म्हसरूळ, पिंपळगाव बहुला, धुळगाव, नाशिक, गणेशगाव, ममईवाडी या विविध गावांमध्ये दरकोस दरमुक्काम करीत गावोगावी कीर्तन, हरिपाठ, प्रवचन, भारु ड, भजनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत त्र्यंबकेश्वरला पोहचते.
या दरम्यान गावागावातून हजारो वारकरी या पदयात्रेत जोडले जात आहेत. त्र्यंबक येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या समाधीवर हे भाविक वारकरी नतमस्तक होणार आहेत. (वार्ताहर)




 

Web Title: From Jayakheda to Shrikhetra Trimbakeshwar Dandi leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.