जायकवाडीसाठी यंदाही पाणी सोडणार : महाजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:42 AM2018-10-15T01:42:01+5:302018-10-15T01:44:31+5:30
परतीच्या पावसाने ओढ दिल्याने काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे़ मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय १५ आॅक्टोबरनंतरच्या बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दिली़
नाशिक : परतीच्या पावसाने ओढ दिल्याने काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे़ मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या जायकवाडी धरणातपाणी सोडण्याचा निर्णय १५ आॅक्टोबरनंतरच्या बैठकीनंतर घेतला जाणार असून, नियमानुसार पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी दिली़
आर्थिकदृष्ट्या मागास मराठा समाजाच्या मुला-मुलींसाठी डॉ़ पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते़
जायकवाडीत यंदा ६५ टक्के इतका साठा असून, मेंढीगिरी समितीच्या शिफारसीनुसार नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे़ यावर महाजन यांनी सांगितले की, धरणांची स्थिती, उपयुक्त जलसाठा, आवश्यकता याचा अभ्यास करून आढावा बैठकीनंतर पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ़ जायकवाडी ६५ टक्क्यांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार पाणी सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असल्याचेही महाजन यांनी सांगितले.