बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी जयंत जायभावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 01:15 AM2022-01-03T01:15:32+5:302022-01-03T01:16:28+5:30
देशभरातील वकिलांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील शीर्षस्थ संस्था असलेल्या बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांची कौन्सिलच्या सचिवांनी बिनविरोध निवड केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या कार्यालयात त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. .
ref='https://www.lokmat.com/topics/nashik/'>नाशिक : देशभरातील वकिलांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील शीर्षस्थ संस्था असलेल्या बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांची कौन्सिलच्या सचिवांनी बिनविरोध निवड केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या कार्यालयात त्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. . महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे एकेकाळी अध्यक्षपद भूषविणारे जायभावे हे अत्यंत अभ्यासू असे विधिज्ञ म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत नाशिकमधून कुठल्याही विधिज्ञाची राष्ट्रीय स्तरावरील वकिलांच्या शीर्षस्थ संस्थेत निवड झाली नाही. जायभावे यांच्या निवडीमुळे नाशिकला हा प्रथमच बहुमान प्राप्त झाला. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सचिवांकडून सदस्यपदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. याकरिता नाशिकमधून जायभावे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले होते. यामुळे त्यांची थेट निवड केली गेली. त्यांच्या निवडीमुळे नाशिकच्या वकील वर्गासह महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.